Sara Tendulkar | Shubhman Gill
Sara Tendulkar | Shubhman GillTeam Lokshahi

सारा तेंडुलकरचा शुभमन गिलसोबत होणार साखरपुडा, सचिनने केली घोषणा; काय आहे नेमके?

शुभमन गिलने 149 चेंडूत द्विशतक झळकावले आहे. यामुळे चाहते गिलवर चांगलेच खूश झाले

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील पहिल्या सामन्यात क्रिकेटपटू शुभमन गिलने शानदार सलामी दिली. गिलने 149 चेंडूत द्विशतक झळकावले आहे. यामुळे चाहते गिलवर चांगलेच खूश झाले असून सोशल माध्यमांतून शुभमन गिलवर शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत. एवढेच नव्हेतर, सचिन तेंडुलकरने त्यांची मुलगी साराशी शुभमन गिलसोबत थेट साखरपुड्याची घोषणा केली आहे. हे आम्ही म्हणत नाही तर सोशल मीडियावरील युझर्स म्हणत आहेत.

शुभमन गिलचे सारासोबत नेहमीच नाव जोडले जाते. द्विशतक झळकावल्यानंतर गिल प्रसिद्धीच्या झोतात आला आणि सचिनची मुलगी सारासोबतच्या त्याच्या अफेअरचे किस्से पुन्हा सोशल मीडियावर ट्रेंड करू लागले. युजर्सनी या दोघांबाबत अनेक प्रकारचे मीम्स बनवले आहेत.

2019 मध्ये, शुभमन गिल कोलकाता नाईट रायडर्स संघाचा एक भाग बनला. या सीझननंतर त्याने 'रेंज रोव्हर' कार खरेदी केली आणि त्याचा फोटोही इन्स्टाग्रामवर शेअर केला. साराने या फोटोवर शुभमनचे अभिनंदन केले आणि शुभमनने हार्टच्या इमोजीसह तिचे आभारही मानले. हार्दिक पांड्याने या पोस्टवर गंमतीत कमेंट केली, तिच्या बाजूने स्वागत आहे. यावर दोघांमधील अफेअरच्या चर्चां रंगल्या होत्या.

परंतु, शुभमन गिल व साराअली खान सोबतही अफेअरच्या चर्चा झाल्या आहेत. जाते. शुभमन गिल सारा अली खानसोबत अनेकदा स्पॉट झाला आहे. यानंतर अफेअरच्या बातम्यांनी जोर धरला. पण एका टॉक शोमध्ये जेव्हा शुभमन गिलला विचारण्यात आले की तो सारा अली खानला डेट करतोय की नाही? यावर शुभमन कदाचित म्हणाला. यानंतर सारा अली खानसोबतचे क्रिकेटरचे फोटो व्हायरल झाले होते. परंतु, यावर दोघांनी कधीही भाष्य केले नाही. यामुळे सारा तेंडुलकर का सारा अली खान याबाबत चाहते संभ्रमात आहेत.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com