शहीन अफ्रीदीला दुखापत झाली नसती तर...; इंग्लंडच्या विजयावर सचिनने केलं ट्विट
इंग्लंडने पाच विकेटने पाकिस्तानवर मात करत रविवारी टी-20 विश्वचषक जिंकला. फास्ट बॅालर सॅम कुरनच्या शानदार खेळीने इंग्लंडने पाकिस्तानला 20 षटकात 137/8 पर्यंत रोखले. इंग्लंड ऑलराउंडर प्लेयर बेन स्टोक्सने हाफ सेन्चुरी मारत टीमला विजयाच्या जवळ पोहचवलं. बेन स्टोक्स आणि सॅम कुरन यांच्या प्रमुख भूमिकेमुळे इंग्लंडने पाकिस्तानचा पाच विकेटने पराभव केला. 2019 साली इंग्लेडने ओडिआय (ODI) जिंकला होता. त्यानंतर रविवारी झालेल्या टी 20 विश्वचषक देखील जिंकले.
"अभिनंदन इंग्लंड दुसरं टी 20 विश्वचषक जिंकल्याबद्दल, विलक्षण कामगिरी. शहीन अफ्रीदीला दुखापत झाली नसती तर खेळ अजून जास्त मनोरंजक झाला असता. वाॅट ए रोलर कोस्टर ऑफ वर्ल्डकप", असे म्हणत सचिनने ट्विट केले.
सचिन तेंडूलकर हा पाकिस्तानच्या खेळात झालेल्या दुखापतीमुळे खेळा बाहेर पडलेल्या क्रिकेटपटू शहीन अफ्रीदी बद्दल बोलत होते. शहीन अफ्रिद त्याच्या तिसऱ्या विकेटला खेळाबाहेर पडला त्यावेळी इंग्लंडला 29 बॅाल्सवर 41 धावांची गरज होती. 16 विकेट नंतर हाफ-टाइमर इफ्तिखार अहमदने पूर्ण केले ज्याने पाच बॅाल मध्ये 13 रन्स घेतले आणि खेळात इंग्लंडने बाजी मारली.