सॅम करेन ठरला आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू

सॅम करेन ठरला आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू

इंडियन प्रीमियर लीग (IPL)मध्ये ऐतिहासिक विक्रम बनला आहे. इंग्लंडचा स्टार अष्टपैलू खेळाडू सॅम कुरनसाठी ही बोली लावण्यात आली आहे.

इंडियन प्रीमियर लीग (IPL)मध्ये ऐतिहासिक विक्रम बनला आहे. आयपीएल 2023 हंगामासाठी मिनी लिलावात इतिहासातील सर्वात मोठी बोली लागली आहे. इंग्लंडचा स्टार अष्टपैलू खेळाडू सॅम करेनसाठी ही बोली लावण्यात आली आहे. या खेळाडूला पंजाब किंग्सने (PBKS)तब्बल 18.50 कोटी रुपयांची बोली लावून विकत घेतले आहे. सॅम करेन आता आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे.

सॅम करेन ठरला आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू
दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला बांगलादेश 7/0, भारताकडे 80 धावांची आघाडी

सॅम करेनला पंजाब किंग्सने (PBKS)तब्बल 18.50 कोटी रुपयांची बोली लावून विकत घेतले आहे. त्याने दक्षिण आफ्रिकेचा माजी अष्टपैलू खेळाडू ख्रिस मॉरिसचा विक्रम मोडला आहे. मॉरिसला आयपीएल 2021 च्या हंगामात राजस्थान रॉयल्सने 16.25 कोटी रुपयांना विकत घेतले होते.

सॅम करेननंतर ऑस्ट्रेलियाच्या कॅमेरून ग्रीनने कहर केला. कॅमेरून ग्रीनसाठी मुंबई इंडियन्स, दिल्ली कॅपिटल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात 2 कोटी रुपयांच्या किमतीची लढत झाली. पण, अखेर मुंबई संघाने 17.50 कोटींची बोली लावून ग्रीनला विकत घेतले. अशाप्रकारे ग्रीन हा आयपीएलच्या इतिहासातील दुसरा सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे.

या ऐतिहासिक बोलीसह करेन आता आयपीएलमधील सर्वाधिक मानधन घेणारा खेळाडू बनला आहे. त्याच्या खालोखाल कॅमेरून ग्रीन दुसऱ्या क्रमांकावर आला आहे. या दोघांनी विराट कोहली आणि केएल राहुलला मागे टाकले आहे. कोहली आणि राहुल यांना 17-17 कोटी रुपये मिळतात. कोहली रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून खेळतो. तर, राहुल लखनऊ सुपर जायंट्सकडून खेळतो.

सॅम करेन ठरला आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू
चेतेश्वर पुजाराने कसोटी सामन्यामध्ये मोडला डॉन ब्रॅडमनचा रेकॉर्ड

दरम्यान, सॅम करेन यावर्षी ऑस्ट्रेलियाने आयोजित केलेल्या टी-20 विश्वचषकात हिरो ठरला. करेनने स्वबळावर इंग्लंड संघाला चॅम्पियन बनवले. त्याने संपूर्ण स्पर्धेत 13 विकेट घेतल्या. तर, अंतिम सामन्यातही पाकिस्तानविरुद्ध तीन महत्त्वपूर्ण विकेट घेतल्या होत्या. सॅम करेन याला अंतिम सामन्यात प्लेअर ऑफ द मॅच तसेच प्लेअर ऑफ द सिरीजचा किताब मिळाला होता. सॅम करेनने आयपीएलमध्ये आतापर्यंत 32 सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने 337 धावा केल्या आहेत आणि 32 विकेट्स घेतल्या आहेत. करेन मागील हंगमापर्यंत महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नई सुपर किंग्ज (CSK) कडून खेळताना दिसला होता.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com