IND vs BAN 2nd Test
IND vs BAN 2nd TestTeam Lokshahi

चेतेश्वर पुजाराने कसोटी सामन्यामध्ये मोडला डॉन ब्रॅडमनचा रेकॉर्ड

चेतेश्वर पुजाराने 7000 कसोटी धावा पूर्ण केल्या आहेत. अशी कामगीरी करणारा तो 8वा भारतीय फलंदाज ठरला आहे.
Published by :
shamal ghanekar

भारत आणि बांगलादेश (India vs Bangladesh) यांच्या दुसरा कसोटी सामना सुरू आहे. या दुसऱ्या कसोटी सामन्यामध्ये भारताचा अनुभवी फलंदाज चेतेश्वर पुजाराने (Cheteshwar Pujara) एक मोठा विक्रम केला आहे. चेतेश्वर पुजाराने 7000 कसोटी धावा पूर्ण केल्या आहेत. अशी कामगीरी करणारा तो 8वा भारतीय फलंदाज ठरला आहे. चेतेश्वर पुजाराने आतापर्यंत 98 कसोटी सामने खेळले आहेत. बांगलादेशविरुद्ध पहिल्या कसोटी सामन्यामध्ये चेतेश्वर पुजाराने त्याच्या कारकिर्दीतील 19वं कसोटी शतक झळकावले.

IND vs BAN 2nd Test
IND Vs BAN: बांगलादेशविरुद्धच्या अटीतटीच्या सामन्यात भारताचा दणदणीत विजय

भारत आणि बांगलादेश यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्यामध्ये चेतेश्वर पुजाराने 12 धावा पूर्ण करत सर डॉन ब्रॅडमन यांना मागे टाकले आहे. याचबरोबर पुजाराने आपल्या 7000 कसोटी धावा पूर्ण केल्या.

चेतेश्वर पुजाराने आतापर्यंत 98 कसोटी सामने खेळले आहेत. या कसोटी सामन्यात 44.77 च्या सरासरीने 7000 धावा पूर्ण केल्या आहेत. तर सर डॉन ब्रॅडमन यांनी आपल्या कसोटी कारकिर्दिमध्ये 55 कसोटी सामने खेळला असून 6996 धावा केल्या आहेत.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com