12 वर्षांच्या सुखी संसारानंतर सानिया मिर्झा आणि शोएब मलिक यांचा घटस्फोट

12 वर्षांच्या सुखी संसारानंतर सानिया मिर्झा आणि शोएब मलिक यांचा घटस्फोट

टेनिस स्टार सानिया मिर्झा आणि पाकिस्तानी क्रिकेटर शोएब मलिक सध्या चर्चेत आहेत.

टेनिस स्टार सानिया मिर्झा आणि पाकिस्तानी क्रिकेटर शोएब मलिक सध्या चर्चेत आहेत. या दोघांचा घटस्फोट झाला आहे. पाकिस्तानी क्रिकेटपटू शोएब मलिक यांच्या जवळच्या एका व्यक्तीने सानिया आणि शोएब यांच्या नात्याबाबत ते वेगळे झाल्याचे सांगितले. काही दिवसांपूर्वी सानिया मिर्झाने सोशल मीडियावर केलेली पोस्ट चर्चेत आली होती. सानियाच्या या पोस्टवरून शोएबसोबतच्या तिच्या नात्यामध्ये दुरावा आल्याची चर्चा सुरु झाली होती.

सानिया आणि शोएबच्या जवळच्या मित्राने सांगितलं आहे की दोघांनी घटस्फोटासाठीची प्रक्रिया सुरु केली आहे आणि दोघांनाही एकमेकांपासून वेगळे राहायचे आहे. असे मिळालेल्या माहितीनुसार समजते. काही दिवसांपूर्वी तिने सानियाने तिचा मुलगा इजहानच्या वाढदिवसाला इजहानचा फोटो शेअर केला होता.

Admin

सानिया आणि शोएब यांनी 12 एप्रिल 2010 रोजी विवाह केला होता. 2018 मध्ये सानियाला मुलगा झाला. या मुलाचं नाव इजहान आहे. सनिया सध्या 35 वर्षांची आहे, तर शोएब मलिक 40 वर्षांचा आहे. दोघांची पहिली भेट भारतात 2004-2005 मध्ये झाली होती. मात्र, या भेटीत दोघांमध्ये फारशी चर्चा झाली नाही. काही वर्षांनंतर दोघेही 2009-2010 मध्ये ऑस्ट्रेलियन शहरात होबार्टमध्ये एकमेकांना भेटले. सानिया टेनिस खेळायला आली होती आणि शोएब त्याच्या टीमसोबत क्रिकेट खेळायला गेला होता.

Lokshahi Marathi
www.lokshahi.com