Sania Mirza ची IPL मध्ये एंट्री; घेतली एक महत्त्वाची जबाबदारी
Admin

Sania Mirza ची IPL मध्ये एंट्री; घेतली एक महत्त्वाची जबाबदारी

भारताची स्टार टेनिसटपूट सानिया मिर्झा आता क्रिकेटच्या मैदानात दिसणार आहे.

भारताची स्टार टेनिसटपूट सानिया मिर्झा आता क्रिकेटच्या मैदानात दिसणार आहे. 6 वेळा ग्रँडस्लॅम विजेती सानियाने तिच्या कारकिर्दीतील प्रत्येक टप्पा गाठला आहे. सानिया या महिन्यात शेवटच्या वेळी टेनिस कोर्टवर धडकणार आहे. यानंतर ती आयपीएलमध्ये व्यस्त होणार आहे. तिला आयपीएलमध्ये प्रवेश मिळाला. ती रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघात सामील झाली आहे.

आरसीबीने तिच्यावर संघाला चॅम्पियन बनवण्याची जबाबदारी दिली आहे. बुधवारी सानियाला आरसीबीच्या महिला संघाची मार्गदर्शक बनवण्यात आले आहे. आयपीएलच्या धर्तीवर वुमन्स प्रीमियर लीग टुर्नामेंट सुरु होणार आहे. RCB ने त्यांच्या अधिकृत टि्वटर अकाऊंटवरुन ही माहिती दिलीय.

“सानिया मिर्झा भारतीय क्रीडा क्षेत्रात महिलांसाठी एक आदर्श आहे. तिने तिच्या करिअरमध्ये एक ठरलेली चौकट मोडली. इतरांसाठी आदर्शवत ठरेल असं काम केलं. मैदानावर आणि मैदानाबाहेर ती चॅम्पियन आहे. RCB च्या महिला क्रिकेट टीमसाठी मार्गदर्शक म्हणून सानियाच नाव जाहीर करताना आम्हाला अभिमान वाटतोय” असं आरसीबीने म्हटलय.

यावर सानियाने प्रतिक्रिया दिली आहे की, मी मागच्या 20 वर्षांपासून व्यावसायिक खेळाडू आहे. क्रीडा क्षेत्रात सुद्धा तुम्ही करिअर घडवू शकता हा विश्वास तरुण महिला, मुलींमध्ये निर्माण करायचा आहे. तसेच प्रत्येक खेळाडू बऱ्याचदा सारखा विचार करतो. दबावाची स्थिती हाताळणं, महत्त्वाच असतं. जे दबाव उत्तमपणे हाताळतात, ते सर्वात मोठे चॅम्पियन ठरतात” असे तिने सांगितले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com