शुभमन गिलला चिडवण्यासाठी चाहत्यांनी घेतलं साराचं नाव; विराट कोहलीची मजेशीर प्रतिक्रिया झाली व्हायरल
Admin

शुभमन गिलला चिडवण्यासाठी चाहत्यांनी घेतलं साराचं नाव; विराट कोहलीची मजेशीर प्रतिक्रिया झाली व्हायरल

24 जानेवारी रोजी खेळल्या गेलेल्या भारताच्या तिसऱ्या वनडेचा व्हायरल व्हिडिओ
Published by :
Siddhi Naringrekar

24 जानेवारी रोजी खेळल्या गेलेल्या भारताच्या तिसऱ्या वनडेच्या व्हायरल व्हिडिओमध्ये, चाहते सारा अली खानचे नाव घेऊन शुभमन गिलला चिडवताना दिसत आहेत. विराट कोहलीची प्रतिक्रिया इंटरनेटवर चांगलीच व्हायरल होत आहे. बॉलीवूड अभिनेत्री सारा अली खान भारतीय क्रिकेटपटू शुभमन गिलला डेट करत असल्याच्या अफवा गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहेत. अलीकडे, इंदूरच्या होळकर स्टेडियमवर, भारत विरुद्ध न्यूझीलंड 3रा एकदिवसीय सामना सुरू होता, त्या दरम्यान चाहते साराच्या नावाचा जयघोष करत शुभमन गिलला चिडवत होते.

24 जानेवारी रोजी खेळल्या गेलेल्या भारताच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्याच्या व्हायरल व्हिडिओमध्ये, चाहते ओरडताना दिसत आहेत, भारतीय क्रिकेट संघ न्यूझीलंडविरुद्ध मैदानात उतरत असतानाचा व्हिडिओ शूट करण्यात आला आहे.

साराच्या नावाने चिडवणाऱ्या प्रेक्षकांकडे पाहून विराट हसताना दिसला. हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर होताच एका ट्विटर युजरने कोहलीच्या प्रतिक्रियेवर कमेंट केली आणि लिहिले की, "तो हसत आहे कारण तोही यातून गेला आहे."

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com