Shardul Thakur Wedding
Shardul Thakur WeddingTeam Lokshahi

शार्दूल पुढील वर्षात अडकणार लग्नबंधनात; त्या ठिकाणी पार पडणार विवाह सोहळा

भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज शार्दूल ठाकूर (Shardul Thakur) हा लवकरच लग्नबंधनात अडकणार असल्याची माहिती समोर येत आहे.

काही दिवसांपासून भारतीय संघाचा सलामीवीर फलंदाज केएल राहूल आणि अभिनेत्री अथिया शेट्टी यांच्या लग्नाच्या चर्चा सुरू असताना आता भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज शार्दूल ठाकूर (Shardul Thakur) हा लवकरच लग्नबंधनात अडकणार असल्याची माहिती समोर येत आहे. शार्दूल त्याची गर्लफ्रेंड मित्ताली परुळकरसोबत (Mittali Parulkar) पुढील वर्षी फेब्रुवारी महिन्यात लग्नबंधनात अडकणार आहे . तसेच शार्दुल ठाकूरची होणारी पत्नी मिताली परुळकर ही एक बिजिनेस वुमन आहे.

शार्दूल आणि मितालीच्या लग्नाबाबतची माहिती स्वत: मितालीने दिली दिली आहे. 25 फेब्रुवारीपासून आमच्या लग्नाचा सोहळा सुरू होणार असल्याचे तिने सांगितले आहे. मिताली पुढे बोलताना म्हणाली की, 'लग्न सोहळा कर्जतमध्ये होणार आहेत. याआधी आम्ही गोव्यामध्ये डेस्टिनेशन वेडिंग करायचं ठरवले होते मात्र काही अडचणीमुळे आम्ही कर्जतमध्ये विवाह सोहळा करण्याचे ठरवले, असे मिताली म्हणाली.

Shardul Thakur Wedding
T20 World Cup | भारतीय संघात शार्दूल ठाकूरची एन्ट्री

लग्नाबद्दल मिताली पुढे म्हणाली की, या लग्न सोहळ्यामध्ये फक्त 200 ते 250 पाहुणे येणार आहेत. टीम इंडियासाठी शार्दुलचे व्यस्त वेळापत्रक लक्षात घेऊन मी लग्नाची सर्व व्यवस्था पाहत असल्याचे सांगितले. तसेच शार्दुल लग्नाच्या दिवशी उपस्थित राहणार असल्याचे तिने सांगितले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com