शुबमन गिलच्या बहिणीला शिवीगाळ; महिला आयोगाने घेतली गंभीर दखल, कठोर कारवाई...

शुबमन गिलच्या बहिणीला शिवीगाळ; महिला आयोगाने घेतली गंभीर दखल, कठोर कारवाई...

क्रिकेटर शुभमन गिलच्या बहिणीला शिवीगाळ करणाऱ्या सोशल मीडिया पोस्टवर दिल्ली महिला आयोगाने कठोर भूमिका घेतली आहे.
Published on

क्रिकेटर शुबमन गिलच्या बहिणीला शिवीगाळ करणाऱ्या सोशल मीडिया पोस्टवर दिल्ली महिला आयोगाने कठोर भूमिका घेतली आहे. याप्रकरणी बुधवारी दिल्ली महिला आयोगाने पोलिसांना नोटीस बजावली. या नोटीसमध्ये एफआयआर नोंदवण्याची मागणी करण्यात आली आहे. यासोबतच दिल्ली महिला आयोगाने दिल्ली पोलिसांना 26 मेपर्यंत सविस्तर कारवाईचा अहवाल सादर करण्यास सांगितले आहे.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्धच्या सामन्यात शुबमन गिलने गुजरात टायटन्ससाठी शानदार शतक झळकावले. यामध्ये गुजरात टायटन्सने सामना आपल्या खिशात घातल्यानंतर आरसीबी स्पर्धेतून बाहेर पडली. परंतु, यामुळे शुबमन गिलची बहीण शाहनील गिल सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ट्रोल झाली आहे.

आरसीबीचा पराभव झाल्यामुळे ट्रोलर्सने शाहनील गिल हिला लक्ष्य केले होते. सोमवारी दिल्ली महिला आयोगाच्या प्रमुख स्वाती मालीवाल यांनी गिलच्या बहिणीला सोशल मीडियावर ट्रोल करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. दिल्ली महिला आयोगाच्या प्रमुख स्वाती मालीवाल यांनी सांगितले की, गिलच्या बहिणीसोबत गैरवर्तन करणाऱ्या सर्वांवर कारवाई केली जाईल. हे सहन केले जाणार नाही.

दरम्यान, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्धच्या सामन्यात गुजरात टायटन्सचा सलामीवीर शुबमन गिलने शानदार शतक झळकावले. या सामन्यात शुबमन गिलने 52 चेंडूत 104 धावांची खेळी केली. त्याने आपल्या खेळीत 5 चौकार आणि 8 षटकार मारले. त्याचवेळी या सामन्यात गुजरात टायटन्सने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा पराभव केला.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com