Pakistan vs New zealand
Pakistan vs New zealandTeam Lokshahi

T20 World Cup: पाकिस्तानचा न्यूझीलंडवर दणदणीत विजय, अंतिम सामन्यात होणार का भारताशी झुंज?

कर्णधार बाबर आझम आणि मोहम्मद रिजवानच्या खेळीमुळे पाकिस्तानचा विजय सोपा

ऑस्ट्रेलियामध्ये सुरु असणाऱ्या टी- २० विश्वचषकात आज सिडनीच्या मैदानात आज पहिला पाकिस्तान विरूद्ध न्यूझीलंड सेमी फायनल सामना खेळवला गेला. या सामन्यात पाकिस्तानने न्यूझीलंडवर दणदणीत विजय मिळवून विश्वचषकाच्या अतिंम सामन्यात जागा मिळवली आहे. त्यामुळे उद्या होणाऱ्या भारत विरुद्ध इंग्लंड या दुसऱ्या सेमी फायनलकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

न्यूझीलंडसोबतच्या या सामन्यात पाकिस्तानने 7 गडी राखून विजय मिळवत फायनल गाठली आहे. न्यूझीलंड आणि पाकिस्तान यांच्यातील या सामन्यात न्यूझीलंड संघानं प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. पण पाकिस्तानच्या भेदक गोलंदाजीसमोर त्यांना केवळ 152 धावांपर्यंतच मजल मारता आली. त्यानंतर पाकिस्तानने सलामीवीर बाबर आणि रिझवानच्या मदतीनं एक दमदार सुरुवात केली आणि अखेर 7 गडी राखून विजय मिळवला. 

Lokshahi Marathi
www.lokshahi.com