टीम इंडियाच्या जर्सीत मोठा बदल, नवीन जर्सीतला खेळाडूंचा फोटो पाहा
Admin

टीम इंडियाच्या जर्सीत मोठा बदल, नवीन जर्सीतला खेळाडूंचा फोटो पाहा

भारत आणि श्रीलंका यांच्यातील टी-२० मालिकेला उद्यापासून सुरूवात होणार आहे.
Published by :
Siddhi Naringrekar

भारत आणि श्रीलंका यांच्यातील टी-२० मालिकेला उद्यापासून सुरूवात होणार आहे. २०२३ मधील ही पहिलीच मालिका टीम इंडिया श्रीलंकेविरुद्ध खेळणार आहे. टी-२० मालिकेचा पहिला सामना मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर होणार आहे.

या मालिकेत टीम इंडिया एका नव्या टायटल स्पॉन्सरसोबत मैदानात उतरणार आहे. मात्र, मालिकेपूर्वी टीम इंडियाच्या जर्सीत मोठा बदल करण्यात आला आहे. यापूर्वी टीम इंडियाच्या जर्सीवर बीसीसीआयच्या लोगोशिवाय MPL स्पोर्ट्सचे नाव दिसत होते. मात्र, आता तिथे किलर हे नाव लिहिलेले दिसणार आहे.

युझवेंद्र चहलने टीम इंडियाच्या नवीन जर्सीसोबतचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. या फोटोमध्ये किलर ब्रँडचा लोगो स्पष्ट दिसत आहे. या फोटोत युझवेंद्र चहल व्यतिरिक्त उमरान मलिक, अर्शदीप सिंग, मुकेश कुमार तसेच ऋतुराज गायकवाड दिसत आहेत. टीम इंडियाच्या जर्सीचा टायटल स्पॉन्सर आता MPLऐवजी किलर ब्रँड बनला आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com