प्रो कबड्डीचा नववा हंगाम आजपासून होणार सुरु; गतविजेत्या दबंग दिल्लीपुढे यू मुम्बाचे आव्हान

प्रो कबड्डीचा नववा हंगाम आजपासून होणार सुरु; गतविजेत्या दबंग दिल्लीपुढे यू मुम्बाचे आव्हान

प्रो कबड्डी लीग आज ७ ऑक्टोबर २०२२ पासून सुरू होणार असून डिसेंबरपर्यंत असणार आहे. उदघाटन सोहळ्यानंतर क्रीडा प्रेमींना पहिल्या तीन दिवसांतच तिहेरी सामन्यांचा आनंद घेता येणार आहे.

प्रो कबड्डी लीग आज ७ ऑक्टोबर २०२२ पासून सुरू होणार असून डिसेंबरपर्यंत असणार आहे. उदघाटन सोहळ्यानंतर क्रीडा प्रेमींना पहिल्या तीन दिवसांतच तिहेरी सामन्यांचा आनंद घेता येणार आहे. पहिल्या ६६ सामन्यांच्या वेळापत्रकामध्ये पहिल्या दोन दिवसातच सर्व १२ संघ मैदानावर उतरणार आहेत. प्रो कबड्डीच्या साखळी फेरीत शुक्रवार व शनिवारी तीन-तीन सामने रंगणार आहेत.

हे सामने बंगळूरु येथील कांटीरवा इनडोअर स्टेडियममध्ये रंगणार आहे. पहिल्या लढतीत लढतीत गतविजेत्या दबंग दिल्लीपुढे यू मुम्बाचे आव्हान असेल. यंदा बंगळूरु, पुणे आणि हैदराबाद या तीन ठिकाणी प्रो कबड्डी लीगचे सामने होणार आहे. तीन वर्षांच्या कालावधीनंतर स्टेडियममध्ये चाहत्यांना प्रवेश मिळणार असल्याने या हंगामाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

प्रो कबड्डी लीगचे आयुक्त अनुपम गोस्वामी यांनी सांगितले की, ‘‘आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताला कबड्डीत पदक जिंकण्याची सर्वाधिक संधी असते. करोना प्रादुर्भावाचा सर्वच खेळांचा फटका बसला, पण या काळात आम्ही खेळाडूंच्या तंदुरुस्तीवर भर दिला. यासह लीगच्या माध्यमातून खेळाडूंना अधिकाधिक सामने खेळण्याचा अनुभव मिळाला,’’

सामने

दबंग दिल्ली वि. यू मुम्बा

वेळ : सायं. ७.३० वा.

बंगळूरु बुल्स वि. तेलुगू टायटन्स

वेळ : रात्री ८.३० वा.

जयपूर पिंक पँथर्स वि. यूपी योद्धाज

वेळ : रात्री ९.३० वा.

थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स

“कबड्डी या स्वदेशी खेळाला समकालीन इतर खेळांबरोबर आणि क्रीडा चाहत्यांच्या भावी पिढ्यांपर्यंत पोहचवण्यासाठी हा उपक्रम आपण दरवर्षी करत असतो. कबड्डी हा खेळ जगासमोर नेण्याच्या दृष्टीकोनातून विवो प्रो कबड्डी लीगचा प्रवास सुरू केला आहे.” असे लीग कमिशनर अनुपम गोस्वामी यांनी सांगितले.

प्रो कबड्डीचा नववा हंगाम आजपासून होणार सुरु; गतविजेत्या दबंग दिल्लीपुढे यू मुम्बाचे आव्हान
प्रो कबड्डी लीग नवव्या हंगामाच्या तारखा जाहीर; पाहा कोणत्या दिवशी होणार सुरुवात

Related Stories

No stories found.
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com