India Vs Australia 3rd Test Match
India Vs Australia 3rd Test MatchTeam Lokshahi

उद्या होणार भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये तिसरा निर्णायक कसोटी सामना; असे असतील दोन्ही संभाव्य संघ

ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्स याला तिसऱ्या कसोटीतून मुक्त करण्यात आलं आहे. त्यामुळे उपकर्णधार असलेला स्टीव्ह स्मिथ तिसऱ्या सामन्यात कर्णधारपद भूषवणार आहे.

बॉर्डर गावसकर ट्रॉफीत सध्या भारतीय संघ उत्कृष्ट कामगिरी करताना दिसत आहे. ऑस्ट्रेलियासोबतच्या 4 सामन्यांच्या टेस्ट मालिकेत भारत 2-0 ने आघाडीवर आहे. नागपूर आणि दिल्ली कसोटीत कांगारुंवर भारताने शानदार विजय मिळवल्यानंतर आता उद्या या दोन्ही संघात तिसरा कसोटी सामना पार पडणार आहे. उद्याचा सामना जिंकून वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलचे तिकीट मिळवण्याचा भारताचा उद्देश असेल.

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्या उद्याचा तिसरा सामना हा इंदूरमधील होळकर स्टेडियममध्ये खेळवला जाणार आहे. या तिसऱ्या सामन्यात टीममध्ये कॅप्टनपासून ते गोलंदाजांपर्यंत प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल पाहायला मिळणार आहेत. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्स याला तिसऱ्या कसोटीतून मुक्त करण्यात आलं आहे. त्यामुळे उपकर्णधार असलेला स्टीव्ह स्मिथ तिसऱ्या सामन्यात कर्णधारपद भूषवणार आहे.

असा असेल संभाव्य भारतीय संघ

रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, केएस भरत (विकेटकीपर), इशान किशन (विकेटकीपर), आर अश्विन, अक्षर पटेल, कुलदीप यादव, रविंद्र जडेजा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, उमेश यादव आणि जयदेव उनाडकट.

असा असेल संभाव्य ऑस्ट्रेलियाचा संघ

स्टीव स्मिथ (कर्णधार), एश्टन एगर, स्कॉट बोलैंड, एलेक्स कॅरी, कैमरून ग्रीन, पीटर हैंड्सकॉम्ब, जोश हेजलवुड, ट्रेविस हेड, उस्मान ख्वाजा, मैथ्यू कुह्नमॅन, मार्नस लाबुशेन, नाथन लियोन, लांस मॉरिस, टॉड मर्फी, मैथ्यू रेनशॉ ,मिशेल स्टार्क आणि मिशेल स्वीपसन.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com