India Vs New Zealand 2 T20
India Vs New Zealand 2 T20Team Lokshahi

आज होणार भारत वि. न्यूझीलंडमध्ये दुसरा टी-20 निर्णायक सामना, जाणून घ्या कधी, कुठे असेल सामना

आजचा सामना भारताने गमावल्यास मालिकाही भारत गमावेल.

न्यूझीलंड विरोधातील एकदिवसीय मालिका जिंकल्यानंतर आता या दोन्ही संघात टी-20 मालिका सुरु आहे. या मालिकेत भारताला पहिल्या सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला. तर न्यूझीलंडने भारतीय दौऱ्यावर आल्यापासून पहिल्या विजय मिळवला आहे. याच टी- 20 मालिकेतील आज दुसरा निर्णायक सामना खेळवला जाणार आहे. आजचा सामना जिंकणे भारतासाठी अतिशय महत्वाचा आहे. कारण तीन सामन्याच्या मालिकेत न्यूझीलंड 1-0 अशी आघाडी घेतली आहे.

कुठे, कधी असेल सामना?

भारत विरुद्ध न्यूझीलंड दुसरा टी- 20 सामना लखनौ येथील भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी मैदानावर खेळवला जाणार आहे. हा सामना ठीक 7 वाजता सुरु होईल. सामन्याच्या अर्धातास आधी नाणेफेक होईल.

भारतीय संघ

हार्दिक पंड्या (कॅप्टन), शुभमन गिल, इशान किशन, राहुल त्रिपाठी, सूर्यकुमार यादव, दीपक हुड्डा, वॉशिंगटन सुंदर, शिवम मावी, कुलदीप यादव, उमरान मलिक आणि अर्शदीप सिंह.

न्यूझीलंड संघ

मिचेल सँटनर (कॅप्टन), फिन ऐलन, डेवन कॉनवे, मार्क चॅपमन, डॅरिल मिचेल, ग्लेन फिलिप्स, मायकल ब्रेसवेल, ईश सोढ़ी, ब्लेयर टिकनर, जेकब डफी आणि लॉकी फर्ग्युसन.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com