उर्वशी रौतेला ऋषभ पंतला भेटण्यासाठी हॉस्पिटलमध्ये पोहोचली

उर्वशी रौतेला ऋषभ पंतला भेटण्यासाठी हॉस्पिटलमध्ये पोहोचली

भारतीय क्रिकेट संघाचा धडाकेबाज फलंदाज ऋषभ पंत 30 डिसेंबर रोजी कार अपघाताचा बळी ठरला होता.

भारतीय क्रिकेट संघाचा धडाकेबाज फलंदाज ऋषभ पंत 30 डिसेंबर रोजी कार अपघाताचा बळी ठरला होता. तेव्हापासून ऋषभवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अलीकडेच ऋषभ पंतला डेहराडूनहून एअरलिफ्ट करून मुंबईतील कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री उर्वशी रौतेला हिने ऋषभ पंतच्या रुग्णालयात दाखल झाल्याचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.

ऋषभ पंतच्या कार अपघातानंतर बॉलीवूड अभिनेत्री उर्वशी रौतेलाने त्याच्यासाठी अनेकवेळा पोस्ट केली. एवढेच नाही तर उर्वशीची आई मीरा सिंह रौतेला यांनीही ऋषभ पंतला लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. सध्या मुंबईतील कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात ऋषभ पंतवर उपचार सुरू आहेत.

Admin

गुरुवारी उर्वशी रौतेलाने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम हँडलवर स्टोरीत या हॉस्पिटलचा फोटो शेअर केला, ज्यामध्ये ऋषभवर उपचार सुरू आहेत. अशा परिस्थितीत आता उर्वशी रौतेला ऋषभ पंतला भेटण्यासाठी हॉस्पिटलमध्ये पोहोचली आहे की काय अशी चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे. तसेच अनेक युजर्स उर्वशी रौतेलाला यामुळे ट्रोल करत आहेत.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com