नेदरलँड्सची विजयी सलामी; सेनेगलवर मात

नेदरलँड्सची विजयी सलामी; सेनेगलवर मात

विश्वचषक फुटबॉल स्पर्धेतील सामन्यात नेदरलँड्सने सोमवारी सेनेगलवर २-० असा विजय मिळवला.

विश्वचषक फुटबॉल स्पर्धेतील सामन्यात नेदरलँड्सने सोमवारी सेनेगलवर २-० असा विजय मिळवला. पहिल्या सत्रात नेदरलँड्सने गोल करण्याचे अनेक प्रयत्न केले. मात्र, त्यांना यश मिळाले नाही. सेनेगलचेही आघाडी घेण्यासाठी प्रयत्न सुरू होते, परंतु त्यांना आघाडी मिळवता आली नाही.

नेदरलँड्सला सामन्याच्या ८४व्या मिनिटाला गाकपोने हेडरच्या साहाय्याने गोल करत १-० अशी आघाडी मिळवून दिली. यानंतर सेनेगलच्या खेळाडूंचे बरोबरी साधण्याचे प्रयत्न सुरू झाले. सेनेगलचेही आघाडी घेण्यासाठी प्रयत्न सुरू होते, परंतु त्यांच्या पदरीही निराशा आली. त्यामुळे मध्यंतरापर्यंत सामना गोलशून्य बरोबरीत होता.

नेदरलँड्सला सामन्याच्या ८४व्या मिनिटाला गाकपोने हेडरच्या साहाय्याने गोल करत १-० अशी आघाडी मिळवून दिली. आघाडीपटू कोडी गाकपो आणि डेवी क्लासेनने दुसऱ्या सत्रात नोंदवलेल्या निर्णायक गोलच्या बळावर चुरशीच्या झालेल्या विश्वचषक फुटबॉल स्पर्धेतील सामन्यात नेदरलँड्सने विजय मिळवला.

Lokshahi Marathi
www.lokshahi.com