Virat Kohli Viral Video
Virat Kohli Viral VideoTeam Lokshahi

बांगलादेशी खेळाडूवर विराट भडकला, व्हिडिओ होतोय प्रचंड व्हायरल

भारताचा स्टार फलंदाज विराट कोहली बांगलादेशच्या तैजूल इस्लामशी भिडला

भारतीय संघ सध्या बांगलादेश दौऱ्यावर आहे. एकदिवसीय मालिका गमावल्यानंतर भारतीय संघ बांगलादेशसोबत दोन सामन्यांची कसोटी मालिका सध्या खेळली जात आहे. त्यातला दुसरा कसोटी सामना सध्या सुरु आहे. या सामन्यात बांगलादेशच्या संघानं भारतासमोर 145 धावांचं लक्ष्य ठेवलं. या लक्ष्याचा पाठलाग करताना भारतानं तिसऱ्या दिवसाखेर चार विकेट्स गमावून 45 धावा केल्या आहेत. हा सामना जिंकण्यासाठी भारत अवघ्या 100 धावा दूर आहे. या सामन्यात भारताचा स्टार फलंदाज विराट कोहली बांगलादेशच्या तैजूल इस्लामशी भिडला, ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com