Virat Kohli,  Sachin Tendulkar
Virat Kohli, Sachin TendulkarTeam Lokshahi

सचिन तेंडुलकरच्या विक्रमाची बरोबरी, विराट कोहलीने झळकवले शतक

भारत आणि श्रीलंका यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या सामन्यात विराट कोहलीने शानदार शतक झळकावले.
Published by :
shweta walge

भारत आणि श्रीलंका यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या सामन्यात विराट कोहलीने शानदार शतक झळकावले. हे त्याचे श्रीलंकेविरुद्धचे नववे आणि वनडे कारकिर्दीतील 45वे शतक होते. 80 चेंडूत झालेल्या या शतकासह विराट कोहलीने महान भारतीय फलंदाज सचिन तेंडुलकरच्या विक्रमाची बरोबरी केली आहे.

मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडूलकरच्या नावावर 20 शतके आहेत. आता किंग कोहलीही येऊन त्याच्या बरोबरीने उभा राहिला आहे. सचिनने घरच्या मैदानावर खेळल्या गेलेल्या 164 सामन्यांमध्ये 20 शतके ठोकली, तर कोहलीने 102 सामन्यांमध्ये हा विक्रम केला.

भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीच्या शतकाच्या जोरावर टीम इंडियाने वनडे मालिकेतील पहिल्या सामन्यात श्रीलंकेला 374 धावांचे लक्ष्य दिले आहे. भारताने 50 षटकात 7 विकेट गमावत 373 धावा केल्या. विराट कोहलीशिवाय कर्णधार रोहित शर्माने 80 आणि शुबगन गिलने 70 धावा केल्या. केएल राहुलने 39 आणि श्रेयस अय्यरने 28 धावांचे योगदान दिले.

Virat Kohli,  Sachin Tendulkar
आजपासून भारत विरुद्ध श्रीलंका एकदिवसीय मालिकेला सुरुवात
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com