Virat Kohli Century Against Afghanistan
Virat Kohli Century Against AfghanistanTeam Lokshahi

Virat Kohli Century Against Afghanistan: किंग कोहलीची 'विराट' खेळी! संघ आधीच बाहेर तरीही विराटचं शतक का होतं महत्वाचं?

आशिया कप 2022 मधून भारतीय संघ बाहेर गेला असला तरी विराट कोहली ईन-फॉर्म आलेला पाहायला मिळतोय. विराटचं इन-फॉर्म येणं संघासाठी का गरजेचं होतं याची 5 कारणं
Published by :
Vikrant Shinde

आशिया कप 2022 मधून भारतीय क्रिकेट संघ हा आधीच बाहेर पडल्यानंतर अफगाणिस्तान विरुद्ध झालेल्या औपचारिक सामन्यामध्ये भारताने दणदणीत विजय मिळवला. या सामन्यामध्ये भारताने मिळवलेल्या विजयामुळे भारतीय संघ आशिया कपच्या स्पर्धेत परतणार नसला तरीही, विराट कोहलीने केलेली उत्कृष्ट खेळी भारतीय संघासाठी अतिशय महत्त्वाची होती. विराट कोहली केलेल्या शतकासह भुवनेश्वर कुमारने पटकावलेल्या 5 विकेट्सचाही या विजयात मोठा वाटा होता.

विराटची कामगिरी:

विराट कोहलीने केवळ 55 चेंडूमध्ये शतक पूर्ण केलं तर एकूण 122 धावा केल्या. विराटने आंतरराष्ट्रीय T-20 सामन्यात झळकावलेलं हे पहिलंच शतक आहे. या आधी त्याने एकदिवसीय आंतरराष्ट्रीय, कसोटी आंतरराष्ट्रीय व IPL मध्ये अनेकदा शतक झळकावलं आहे. कालच्या सामन्यात विराटने केवळ 61 चेंडूत नाबाद 122 धावा केल्या. ही खेळी करताना त्याचा स्ट्राईक रेट 200 इतका अवाढाव्य राहिला. त्याने केलेल्या 122 धावांच्या खेळीमध्ये 6 षटकार व 12 चौकारांचा समावेश आहे.

Virat Kohli Century Against Afghanistan
Asia cupचा शेवट गोड, पावणे तीन वर्षानंतर झळकावले विराटने शतक

विराटचं शतक का होतं महत्त्वाचं?

  1. विराट कोहली हा भारतीय क्रिकेटच्या इतिहासातील सर्वोत्तम खेळाडूंपैकी एक आहे.

  2. विराटने याआधीचं आंतरराष्ट्रीय शतक नोव्हेंबर 2019 मध्ये केलं होतं

  3. मागील 2 वर्षांमध्ये विराट कोहली फॉर्ममध्ये नव्हता

  4. पुढच्या महिन्यात विश्व चषक असल्यानं विराटचं फॉर्ममध्ये येणं गरजेचं होतं

  5. विराटच्या या खेळीनं विराटसह संपुर्ण संघाचंच मनोबल उंचावलं आहे

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com