टीम इंडियासाठी वाईट बातमी, हर्षल पटेलच्या चेंडूने विराट कोहली झाला जखमी

टीम इंडियासाठी वाईट बातमी, हर्षल पटेलच्या चेंडूने विराट कोहली झाला जखमी

इंग्लंडविरुद्धच्या सेमीफायनल सामन्यापूर्वी टीम इंडियाच्या चाहत्यांसाठी एक वाईट बातमी समोर आली आहे.

इंग्लंडविरुद्धच्या सेमीफायनल सामन्यापूर्वी टीम इंडियाच्या चाहत्यांसाठी एक वाईट बातमी समोर आली आहे. टीम इंडियाचा स्टार फलंदाज विराट कोहली जखमी झाला आहे. नेटचा सराव करताना हर्षल पटेलचा चेंडू विराट कोहलीच्या मांडीवर आदळला. वृत्तानुसार, विराट कोहलीला खूप दुखापत झाली असून तो नेट प्रॅक्टिस अर्धवट सोडून मैदानाबाहेर गेला आहे. विराट कोहलीच्या दुखापतीबाबत अद्याप फारशी माहिती समोर आलेली नाही. विराट कोहली इंग्लंडविरुद्धच्या सेमीफायनल सामन्यापूर्वी नेट सराव करत होता. हर्षल पटेलच्या एका वेगवान चेंडूने विराट कोहलीच्या मांडीला दुखापत झाली आहे. दुखापतीनंतर विराट कोहली मैदानाबाहेर गेला. संघ व्यवस्थापनाकडून विराट कोहलीबाबतचे अपडेट लवकरच जारी केले जाऊ शकते.

विराट कोहलीची दुखापत टीम इंडियासाठी मोठा धक्का ठरू शकते. विराट कोहली या स्पर्धेत भारतासाठी सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे. टीम इंडियाने गटात अव्वल स्थान पटकावत उपांत्य फेरीत धडक मारली हा विराट कोहलीच्या कामगिरीचा चमत्कार आहे. विराट कोहली हा त्या उंचीचा खेळाडू आहे ज्याची जागा दुसरा कोणी घेऊ शकत नाही. याआधी मंगळवारी कर्णधार रोहित शर्मालाही नेट सराव करताना दुखापत झाली होती. मात्र, काही वेळाने रोहित शर्मा मैदानात परतला. रोहित शर्माने बुधवारी त्याचे फिटनेस अपडेट जारी केले. सेमीफायनल सामना खेळण्यासाठी तो पूर्णपणे तंदुरुस्त असल्याचे रोहित शर्माने सांगितले आहे.

बॅटिंगमध्ये बॅकअपसाठी टीम इंडियाकडेही फारसे पर्याय नाहीत. जर विराट कोहली उपांत्य फेरीच्या सामन्यातून बाहेर पडला तर त्याच्या जागी ऋषभ पंतला प्लेइंग 11 मध्ये संधी दिली जाऊ शकते.

Lokshahi Marathi
www.lokshahi.com