टीम इंडिया बदलणार! विराट, रोहितला आता टी-२० संघात स्थान नाही?

टीम इंडिया बदलणार! विराट, रोहितला आता टी-२० संघात स्थान नाही?

टी-20 विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत इंग्लंडकडून 10 गडी राखून पराभव स्वीकारल्यानंतर टीम इंडिया आता टीकाकारांच्या रडारवर आहे.

नवी दिल्ली : टी-20 विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत इंग्लंडकडून 10 गडी राखून पराभव स्वीकारल्यानंतर टीम इंडिया आता टीकाकारांच्या रडारवर आहे. यातच भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) आता कठोर भूमिका घेणार असल्याची माहिती मिळत आहे. आगामी टी-20 विश्वचषकात विराट कोहली आणि रोहित शर्मा खेळताना दिसणार नाही.

 टीम इंडिया बदलणार! विराट, रोहितला आता टी-२० संघात स्थान नाही?
भारताच्या पराभवानंतर रोहित शर्माला अश्रू अनावर; पाहा व्हिडिओ

माहितीनुसार, फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विन आणि यष्टीरक्षक फलंदाज दिनेश कार्तिक यांच्यासाठी हा शेवटचा विश्वचषक असण्याची शक्यता आहे. याशिवाय विराट कोहली आणि रोहित शर्मा यांनाही हळूहळू संघातून वगळण्यात येणार आहे. मात्र, निवृत्तीचा निर्णय खेळाडूलाच घ्यावा लागणार आहे.

इंग्लंडविरुद्धच्या दारूण पराभवानंतर रोहित शर्मा निराश दिसत होता. त्यानंतर त्याला प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी दिलासा दिला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पुढील टी-20 विश्वचषक आता दोन वर्षांनी होणार आहे. अशा परिस्थितीत बीसीसीआयला हार्दिक पांड्यामध्ये भावी कर्णधाराची झलक दिसत आहे. म्हणजेच पुढील टी-20 आणि एकदिवसीय संघाचा कर्णधार हार्दिक असू शकतो हे स्पष्ट झाले आहे.

 टीम इंडिया बदलणार! विराट, रोहितला आता टी-२० संघात स्थान नाही?
सेमी फायनलमध्ये भारतावर इंग्लंडचा दणदणीत विजय; भारताचं विश्वचषकाचं स्वप्न भंगलं

सूत्रांनी सांगितले की, बीसीसीआय कोणालाही निवृत्त होण्यास सांगणार नाही. हा खेळाडूंचा वैयक्तिक निर्णय आहे. पण, 2023 पर्यंतच्या पुढच्या टी-20 विश्वचषकापर्यंत बहुतांश वरिष्ठ खेळाडू कसोटी आणि एकदिवसीय सामने खेळताना दिसतील. मात्र, राहुल द्रविडला कोहली आणि रोहितसारख्या वरिष्ठ खेळाडूंच्या भवितव्याबद्दल विचारले असता तो म्हणाला की, उपांत्य फेरीच्या सामन्यानंतर याबाबत बोलणे घाईचे आहे. या खेळाडूंनी आमच्यासाठी चांगली कामगिरी केली आहे. यावर विचार करायला खूप वेळ आहे, अशी प्रतिक्रिया त्याने दिली.

दरम्यान, विराट कोहलीने या विश्वचषकात आतापर्यंत 6 सामन्यात सर्वाधिक 296 धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याची सरासरी ९८.६६ होती. कोहलीने 4 अर्धशतके ठोकली. तर रोहित शर्माने 6 सामन्यात 19.33 च्या सरासरीने फक्त 116 धावा केल्या. त्याचवेळी फिरकीपटू अश्विनने 6 सामन्यात फक्त 6 विकेट्स घेतल्या.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com