Virender Sehwag | WTC Final मधील पराभवानंतर सेहवागने पोस्ट केलं भन्नाट Meme

Virender Sehwag | WTC Final मधील पराभवानंतर सेहवागने पोस्ट केलं भन्नाट Meme

दरम्यान भारत न्यूझीलंडकडून वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात पराभूत झाल्यानंतरही निराश वीरुने खेळाडू वृत्तीने एक मजेशीर Meme शेअर केला आहे. भारताचा सर्वात स्फोटक फलंदाज म्हणून प्रसिद्ध असणारा वीरेंद्र सेहवाग मागील काही वर्षांपासून सोशल मीडियावरही तुफान फटकेबाजी करतो आहे. कधी ट्विट तर कधी एखाद्या ट्वीटला रिप्लायदेत वीरेंद्र सेहवाग त्याचा सेन्स ऑफ ह्युमर किती भारी आहे हे दाखवून देतो. हे मीम म्हणजे प्रसिद्ध वेब सिरीज मिर्झापुरमधील एक डायलॉग आहे.

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील सामना संपल्यानंतर सेहवागने न्यूझीलंड संघाला शुभेच्छा दिल्या होत्या. न्यूझीलंडने दोन वर्षांपूर्वी थोडक्यात 50 ओव्हरचा विश्वचषक गमावला होता. पण त्यानंतर सर्वांत पहिले वर्ल्ड टेस्ट चॅम्पियन होण्याचा मान न्यूझीलंडने मिळवला यासाठी तुमचे अभिनंदन. तुम्ही या विजयास पात्र आहात. असं ट्विट सेहवागने शेअर केलं होतं.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com