MS Dhoni
MS Dhoni Team Lokshahi

महेंद्र सिंग धोनीची इंस्टाग्राम पोस्ट का होतीय व्हायरल ?

धोनीने इंस्टाग्रामवर डिपी बदलल्यापासून त्याच्या पोस्टवर अनेक चाहत्यांनी कमेंट केली आहे. ती पोस्ट प्रचंड शेअर देखील केली जात आहे

देशाला स्वातंत्र मिळून येत्या 15 ऑगस्ट रोजी 75 वर्ष पूर्ण होत आहे. त्याच पार्श्वभुमीवर संपूर्ण देशात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. भारत सरकारने देशात हर घर तिरंगा मोहीम राबवण्याची घोषणा केल्यानंतर प्रत्येक घरात तिरंगा लावून स्वातंत्र दिन साजरा जात आहे. अनेक मोठ्या राजकीय लोकांनी आपल्या सोशल मीडियावर तिरंगा ध्वजाचा डीपी लावला आहे. या दरम्यान महेंद्र सिंग धोनीने सुद्धा आपल्या सोशल माध्यमावरील डीपी बदलला आहे. त्या डीपीवर त्यांनी छान असे कॅप्शन सुद्धा लिहले आहे. या पोस्टमुळे जोरदार चर्चा चाहत्यांमध्ये होत आहे.

काय लिहिले धोनीने पोस्टमध्ये ?

आज भारताचा माजी कर्णधार महेंद्र सिंग धोनी याने सुध्दा आपल्या इंस्टाग्राम प्रोफाइल चित्र बदलले आहे. त्याने अपलोड केलेल्या फोटोमध्ये तिरंगा आहे. तसेच त्या तिरंग्यावरती एक खास संदेश देखील लिहिला आहे. माझे भाग्य आहे की मी भारतीय आहे. महेंद्र सिंग धोनी याने त्याचा इंस्टाग्रामवर डीपी बदलल्यापासून त्याच्या पोस्टवर अनेक चाहत्यांनी कमेंट केली आहे. त्याचबरोबर महेंद्र सिंग धोनीची पोस्टचा फोटो देखील शेअर केला आहे. त्यामुळे महेंद्र सिंग धोनी याची इंन्स्टाग्राम पोस्ट चर्चेची ठरली आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com