मुंबई इंडियन्सकडून अर्जुन तेंडुलकरला संधी मिळणार का? रोहित शर्माने सांगितले...
Admin

मुंबई इंडियन्सकडून अर्जुन तेंडुलकरला संधी मिळणार का? रोहित शर्माने सांगितले...

सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकर अद्यापही आयपीएलमध्ये पदार्पण करता आलेलं नाही.
Published on

सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकर अद्यापही आयपीएलमध्ये पदार्पण करता आलेलं नाही. यंदा तो आयपीएलमध्ये सहभाग घेऊ शकतो का? असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे. दोन्ही सीझन तो बेंचवर होता. पत्रकार परिषदे दरम्यान मुंबई संघाचा कर्णधार रोहित शर्मा आणि प्रशिक्षक मार्क बाऊचर यांना अर्जुन तेंडुलकरबद्दल विचारण्यात आले.

त्यावर बोलताना रोहित शर्मा म्हणाला की, गोलंदाज म्हणून त्याला संघात संधी दिली जाऊ शकते. त्याची गोलंदाजी चांगली आहे.तो डावखुरा वेगवान गोलंदाज आहे. तो फलंदाजीही करू शकतो. पण संघ त्याच्यासाठी काय योजना आखतो हे पाहावं लागणार आहे.अर्जुन त्याच्या वडिलांप्रमाणे स्पिनर नाही. अर्जुनला यावर्षी प्लेइंग 11 मध्ये संधी मिळू शकते. असे रोहीत शर्मा म्हणाला.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com