WPL 2023 : आज मुंबई इंडियन्स विरुद्ध आरसीबी सामना होणार; कोण कोणावर भारी पडणार?
Admin

WPL 2023 : आज मुंबई इंडियन्स विरुद्ध आरसीबी सामना होणार; कोण कोणावर भारी पडणार?

महिला प्रीमियर लीग 2023 चा चौथा सामना 6 फेब्रुवारी रोजी मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगलोर यांच्यात होणार आहे.

महिला प्रीमियर लीग 2023 चा चौथा सामना 6 फेब्रुवारी रोजी मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगलोर यांच्यात होणार आहे. मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्या महिला संघांमध्ये सामना मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडियमवर होणार आहे.

या सामन्यात मुंबई इंडियन्सचे लक्ष्य सलग दुसऱ्या विजयाची मागे लागले आहे. हरमनप्रीत कौरच्या संघाने पहिल्या सामन्यात गुजरात जायंट्सवर दणदणीत विजय मिळवला. तर आरसीबीला पहिल्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध पराभव स्वीकारावा लागला होता. मुंबई विरुद्ध आरसीबी सामन्यात कोणता संघ विजयी होतो. हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे.

मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू या महिला संघांमधील सामना भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7.30 वाजता सुरू होईल. सामन्याच्या अर्धा तास आधी म्हणजेच 7 वाजता टॉस होईल.

Related Stories

No stories found.
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com