कुस्तीपटू बजरंग पुनियाचा नवा विक्रम; जिंकले कांस्यपदक

कुस्तीपटू बजरंग पुनियाचा नवा विक्रम; जिंकले कांस्यपदक

2022 राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक विजेता बजरंग पुनियाने जागतिक कुस्ती स्पर्धेत कांस्यपदक जिंकले आहे. जागतिक कुस्ती स्पर्धेत भारताचे हे दुसरे पदक आहे. बजरंगने 65 किलो वजनी गटात कांस्यपदकाच्या लढतीत पोर्तो रिकोच्या सेबॅस्टियन रिवेराचा 11-9 असा पराभव केला.

2022 राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक विजेता बजरंग पुनियाने जागतिक कुस्ती स्पर्धेत कांस्यपदक जिंकले आहे. जागतिक कुस्ती स्पर्धेत भारताचे हे दुसरे पदक आहे. बजरंगने 65 किलो वजनी गटात कांस्यपदकाच्या लढतीत पोर्तो रिकोच्या सेबॅस्टियन रिवेराचा 11-9 असा पराभव केला. भारतीय कुस्तीपटू बजरंग पुनियाने बेलग्रेड येथे सुरू असलेल्या जागतिक कुस्ती स्पर्धेत कांस्यपदक जिंकून इतिहास रचला. जागतिक कुस्ती स्पर्धेत चार पदके जिंकणारा बजरंग हा एकमेव भारतीय कुस्तीपटू आहे.

बजरंग पुनियाचे हे जागतिक स्पर्धेतील तिसरे आणि एकूण चौथे कांस्यपदक आहे. त्याने २०१३ मध्ये कांस्य, २०१८ मध्ये रौप्य आणि २०१९ मध्ये कांस्यपदक जिंकले होते. बजरंग व्यतिरिक्त, विनेश फोगटने महिलांच्या ५३ किलो गटात तिचे दुसरे कांस्यपदक जिंकले. विनेशने स्वीडनच्या एमा माल्मग्रेनचा 8-0 असा पराभव करत कांस्यपदक जिंकले होते.

जागतिक कुस्ती स्पर्धेच्या सुरुवातीच्या सामन्यात बजरंगला पराभव पत्करावा लागला होता, पण त्याला रेपेचेजमध्ये कांस्यपदक जिंकण्याची संधी मिळाली. रिपेचेजच्या पहिल्या सामन्यात त्याने आर्मेनियन कुस्तीपटू व्हेजगेन टेवान्यानचा पराभव केला. याआधी बजरंगला सलामीच्याच सामन्यात दुखापत झाली होती. त्याच्या डोक्याला दुखापत झाली होती, पण तरीही त्याने स्पर्धेत राहण्याचा निर्णय घेतला.

Lokshahi
www.lokshahi.com