वृद्धीमान साहाचा पराक्रम! फक्त इतक्या चेंडूंमध्ये  केले सर्वात वेगवान अर्धशतक

वृद्धीमान साहाचा पराक्रम! फक्त इतक्या चेंडूंमध्ये केले सर्वात वेगवान अर्धशतक

अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर आज आयपीएलमध्ये गुजरात टायटन्स आणि लखनऊ सुपर जायंट्स यांच्यात खेळली जात आहे. या

अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर आज आयपीएलमध्ये गुजरात टायटन्स आणि लखनऊ सुपर जायंट्स यांच्यात सामना खेळवला जात आहे. या सामन्यात एलएसजीने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना गुजरातची सुरुवात चांगली झाली. 38 वर्षीय वृद्धीमान साहाने फलंदाजी करताना मैदान गाजवले. साहाने केवळ 20 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले असून गुजरात टायटन्सकडून सर्वात जलद अर्धशतक झळकावणारा तो फलंदाज ठरला आहे

पॉवरप्लेमध्ये साहाने शुभमन गिलसह ७८ धावा केल्या. या मोसमातील हा चौथा सर्वोच्च पॉवरप्ले स्कोअर आहे. त्याचबरोबर गुजरातने आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक पॉवरप्ले स्कोअरही नोंदवला आहे. पॉवरप्लेमध्ये साहाने 54 धावा केल्या. या मोसमातील पॉवरप्लेमधील कोणत्याही फलंदाजाची ही सर्वोच्च धावसंख्या आहे.

साहाला शुभमन गिलनेही चांगली साथ दिली. 5 षटकांनंतर गिलने वेगवान फलंदाजी करण्यास सुरूवात केली. दोघांमध्ये पहिल्या विकेटसाठी 142 धावांची भागीदारी झाली. 13व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर साहा कॅचआऊट झाला. त्याने 43 चेंडूत 10 चौकार आणि 4 षटकारांच्या मदतीने 81 धावा केल्या.

या सामन्यात गुजरात संघाने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांत 2 गडी गमावून 227 धावा केल्या. संघासाठी शुभमन गिलने 94 धावांची नाबाद खेळी खेळली आणि ऋद्धिमान साहानेही 81 धावा केल्या. लखनऊकडून गोलंदाजीत मोहसीन खान आणि आवेश खान यांनी 1-1 विकेट घेतली.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com