संजय दौंड
संजय दौंड

सभागृहात शीर्षासन करणारे कोण आहेत संजय दौंड?

Published by :
Jitendra Zavar
Published on

विकास माने| बीड Beed

राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा (maharashtra assembly session)पहिला दिवस वादळी ठरला. या दिवशी दोन्ही पक्ष आक्रमक झाले असतांना शीर्षासन करणारे आमदार संजय दौंड (Sanjay Daund)यांनी लक्ष वेधून घेतले. त्यांनी खाली डोके वर पाय करत राज्यपालांच्या विरोधात निषेधासन करत शीर्षासन केले. चर्चेत आलेले संजय दौड आहेत तरी कोण?

संजय दौंड (Sanjay Daund) यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कोट्यातून विधान परिषदेची उमेदवारी मिळाली. जानेवारी २०२० मध्ये त्यांच्या विरोधातील भाजपचे प्रसाद लाड यांनी माघार घेतल्याने दौंड बिनविरोध निवडून आले होते. संजय दौंड हे माजी मंत्री पंडितराव दौंड यांचे पुत्र आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि पंडितराव यांचे जुने संबंध आहेत. त्यामुळे त्यांना विधानपरिषदेची तिकीट मिळाले.

शीर्षासन का करु शकले

संजय पंडितराव दौंड यांचे अंबाजोगाई तालुक्यातील दौंडवाडी हे मुळगाव आहे. या ठिकाणी त्यांची व्यायामशाळा असून ते दररोज एक तास व्यायाम करतात. तसेच परिसरातील पहिलवानांशी चांगले संबंध असून त्यांना पौष्टिक प्रथिनयुक्त पदार्थ वाटप केले जाते

जिल्हा परिषदेत ठसा उमटवला
अनेक वर्षांपासून संजय दौंड बीडच्या राजकारणात सक्रिय आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थेत म्हणजेच जिल्हा परिषद सदस्य म्हणूनही त्यांनी आपल्या कामाचा ठसा उमटवलेला आहे. त्यांचा अनुभव तसेच राजकीय पार्श्वभूमीमुळे त्यांना दौंड यांना विधान परिषद सदस्यत्वाची बक्षिसी मिळाली होती.

काय म्हणाले संजय दौंड ?
राज्यातील महाविकास आघाडी सरकारने चांगलं काम केलं आहे. अधिवेशाची सुरुवात राज्यपालांच्या अभिभाषणाने होती. परंतु त्यांनी आपले अभिभाषण पुर्ण केलं नाही. अभिभाषणात शासनाची भूमिका राज्यपाल मांडत असतात. हे काम विरोधकांना ऐकायचं नव्हतं. राज्यपालांनी औरंगाबादमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांविषयी आक्षेपार्ह शब्द वापरले होते. विरोधकांनी गोंधळ घातला. राज्यपाल राष्ट्रगीत न होता निघून गेले. त्यांनी या राज्याचा अपमान केला आहे, त्यांचा मी धिक्कार करतो. त्यांचा निषेध म्हणून मी खाली डोकं वर पाय केलं.

https://lokshahi.live/maharashtra-assembly-session-what-happen-in-first-day/

बीएसस्सी पदवी घेतांना काँग्रेस प्रणीत एनएसयुआय चळवळीत काम केले. बीएसस्सी पदवी पुर्ण केल्यानंतर वडील माजी राज्यमंत्री अँड. पंडीतराव दौंड यांच्या नेतृत्वाखाली राजकीय जीवनात प्रवेश केला.

१९९२-१९९७ साली घाटनांदुर जि.प. मतदार संघाचे सर्वप्रथम प्रतिनिधीत्व केले.
१९९७-२००२ धर्मापुरी जि.प. मतदार संघाचे प्रतिनिधित्व
२०१०-२०१२ पट्टीवडगाव जि. प. मतदार संघाचे प्रतिनिधित्व
२०१२-२०१७ परळी कृषी उत्पन्न बाजार समिती सदस्य

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com