लोकप्रिय मुख्यमंत्र्यांच्या यादीत TOP-5 मध्ये उद्धव ठाकरे, पटकावलं ‘हे’ स्थान

लोकप्रिय मुख्यमंत्र्यांच्या यादीत TOP-5 मध्ये उद्धव ठाकरे, पटकावलं ‘हे’ स्थान

Published by :
Published on

मुंबई | देशातील लोकप्रिय मुख्यमंत्र्यांच्या यादीमध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्थान पटकावलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी टॉप पाचच्या यादीत असून ते चौथ्या क्रमांकावर आहेत. इंडिया टुडेच्या मूड ऑफ द नेशननं हा अहवाल दिला आहे.

लोकप्रिय मुख्यमंत्र्यांच्या यादीत ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक पहिल्या, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी दुसऱ्या क्रमांकावर आहेत. तिसऱ्या क्रमांकावर तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम.के.स्टॅलिन, केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन पाचव्या स्थानावर आहेत.

लोकांनी मुख्यमंत्र्यांना दिलेली पसंती खालीलप्रमाणे

  • ओडिसा – नवीन पटनायक – 71.1 टक्के
  • पश्चिम बंगाल – ममता बॅनर्जी – 69.9 टक्के
  • तामिळनाडू – एम के स्टॅलिन – 67.5 टक्के
  • महाराष्ट्र – उद्धव ठाकरे – 61.8 टक्के
  • केरळ- पिनाराई विजयन – 61.1टक्के
  • दिल्ली- अरविंद केजरीवाल – 57.9 टक्के
  • आसाम – हिमंता बिस्वा सरमा – 56 टक्के
  • छत्तीसगड – भूपेश बघेल – 51.4 टक्के
  • राजस्थान- अशोक गेहलोत – 44.9 टक्के

पंतप्रधान नरेंद्र मोदी जगातील सर्वाधिक लोकप्रिय नेते

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकप्रिय नेत्यांच्या यादीत अव्वल क्रमांक मिळवला आहे. जगातील लोकप्रिय नेत्यांच्या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव आघाडीवर आहे. जागतिक नेत्यांमध्ये पंतप्रधान मोदी 71 टक्के रेटिंगसह अव्वल स्थानावर आहेत.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com