Chandrashekhar Bawankule : 'कॉंग्रेस फोडा, कॉंग्रेस रिकामी करा' Lokशाही मराठीच्या हाती चंद्रशेखर बावनकुळेंची ऑडिओ क्लिप

कॉंग्रेस फोडा: चंद्रशेखर बावनकुळेंच्या ऑडिओ क्लिपमुळे भाजपच्या रणनीतीचा खुलासा.

'कॉंग्रेसला फोडा, कॉंग्रेस रिकामी करा' असा कानमंत्र चंद्रशेखर बावनकुळेंनी (Chandrashekhar Bawankule) भाजप (BJP) पदाधिकाऱ्यांना दिला आहे. बावनकुळेंचे कार्यकर्त्यांना कॉंग्रेस (Congress) फोडण्याचे आदेश देण्यात आले आहेत. शिवसेना(Shivsena), राष्ट्रवादीनंतर (NCP) आता भाजपच्या निशाण्यावर कॉंग्रेस आहे का? अशा चर्चा सुरु आहेत.

कॉंग्रेस कार्यकर्त्यांना त्यांच्या पक्षाकडून काही अपेक्षा नाही आहेत असं वक्तव्य चंद्रशेखर शेखर बावनकुळेंनी पुण्याच्या (Pune) भाजप पदाधिकारी बैठकीत केलेलं आहे. जितका कॉंग्रेस पक्ष रिकामा होईल तितका आर्थिक फायदा होईल असं देखील बावनकुळेंनी म्हटलं आहे. या संदर्भातील चंद्रशेखर बावनकुळेंची ऑडिओ क्लिप लोकशाही मराठीच्या हाती लागली आहे.

चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की,"कॉंग्रेस पक्ष जेवढा तुम्ही खाली कराल तेवढा तुम्हाला आर्थिक फायदा आहे. तुमच्याकडे देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) आहेत, मी आहे, मुरली बसले आहेत. भाजप पक्ष आधी आपल्या कार्यकर्त्यांचा विचार करत " असं चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले आहेत.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com