गणेश भक्तांसाठी आनंदाची बातमी! विसर्जनाच्या रात्री धावणार 10 विशेष लोकल; पाहा वेळापत्रक

गणेश भक्तांसाठी आनंदाची बातमी! विसर्जनाच्या रात्री धावणार 10 विशेष लोकल; पाहा वेळापत्रक

मध्य रेल्वेने गणपती विसर्जनानिमित्त प्रवाशांच्या सोयीसाठी विशेष सोय केली आहे. ही सेवा 28 सप्टेंबरच्या मध्यरात्रीपासून सुरु होणार आहे.

मुंबई : मध्य रेल्वेने गणपती विसर्जनानिमित्त प्रवाशांच्या सोयीसाठी विशेष सोय केली आहे. 29 सप्टेंबर रोजी सीएसएमटी-कल्याण/ठाणे/बेलापूर स्थानकांदरम्यान 10 उपनगरीय विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे. ही सेवा 28 सप्टेंबरच्या मध्यरात्रीपासून सुरु होणार आहे. या उपनगरीय विशेष ट्रेन सर्व स्थानकांवर थांबतील.

गणेश भक्तांसाठी आनंदाची बातमी! विसर्जनाच्या रात्री धावणार 10 विशेष लोकल; पाहा वेळापत्रक
पंतप्रधान मोदींचं 'ते' विधान क्लेशदायक : शरद पवार

मेन लाइन - डाऊन स्पेशल:

सीएसएमटी-कल्याण स्पेशल सीएसएमटीहून 01.40 वाजता सुटून कल्याणला 3.10 वाजता पोहोचेल.

सीएसएमटी-ठाणे स्पेशल सीएसएमटीहून 02.30 वाजता सुटेल आणि 03.30 वाजता ठाण्याला पोहोचेल.

सीएसएमटी-कल्याण स्पेशल सीएसएमटीहून 03.25 वाजता सुटेल आणि 4.55 वाजता कल्याणला पोहोचेल.

मुख्य लाइन अप विशेष:

कल्याण-सीएसएमटी स्पेशल कल्याणहून 00.05 वाजता सुटेल आणि 01.30 वाजता सीएसएमटीला पोहोचेल.

ठाणे-सीएसएमटी स्पेशल ठाणे येथून 01.00 वाजता निघेल आणि सीएसएमटीला 02.00 वाजता पोहोचेल.

ठाणे-सीएसएमटी स्पेशल ठाणे येथून 02.00 वाजता निघेल आणि सीएसएमटीला 03.00 वाजता पोहोचेल.

हार्बर लाईन - डाऊन स्पेशल :

सीएसएमटी-बेलापूर स्पेशल सीएसएमटीहून 01.30 वाजता सुटेल आणि बेलापूरला 02.35 वाजता पोहोचेल.

सीएसएमटी- बेलापूर स्पेशल सीएसएमटीहून 02.45 वाजता सुटेल आणि बेलापूरला 03.50 वाजता पोहोचेल.

हार्बर लाइन अप विशेष:

बेलापूर - सीएसएमटी स्पेशल बेलापूरहून 01.15 वाजता सुटेल आणि सीएसएमटीला 02.20 वाजता पोहोचेल.

बेलापूर - सीएसएमटी स्पेशल बेलापूरहून 02.00 वाजता सुटेल आणि सीएसएमटीला 03.05 वाजता पोहोचेल.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com