राज्यात 10 वीचा निकाल जाहीर! कोकण विभाग अव्वल, मुलींनी मारली बाजी

राज्यात 10 वीचा निकाल जाहीर! कोकण विभाग अव्वल, मुलींनी मारली बाजी

महाराष्ट्र माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाच्या इयत्ता 10 वीच्या परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांचा बोर्डाकडून एसएससी (SSC) 10 वी परीक्षेचा निकाल आज जाहीर करण्यात आला आहे.
Published by :
Dhanshree Shintre

महाराष्ट्र माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाच्या इयत्ता 10 वीच्या परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांचा बोर्डाकडून एसएससी (SSC) 10 वी परीक्षेचा निकाल आज जाहीर करण्यात आला आहे. दहावीचा निकाल 95.81 % लागला असून यंदाही मुलींनी बाजी मारली आहे. मुलींचा निकाल 97.21 टक्के तर मुलांचा निकाल 94.56 टक्के लागला आहे. मुलींचा निकाल मुलांपेक्षा 2.65 टक्के ने जास्त लागला आहे. महत्वाची बाब म्हणजे यावर्षी निकालामध्ये कोकण विभागानं बाजी मारली असून नागपूर विभाग मात्र शेवटला फेकला गेला आहे.

मुलींचा निकाल - 97.21 टक्के

मुलांचा निकाल - 94.56 टक्के

मुलींचा निकाल मुलांपेक्षा 2.65 टक्के ने अधिक आहे.

राज्यात कोकण विभागाचा सर्वाधिक निकाल 99 टक्के. सर्वात कमी निकाल नागपूर विभागाचा निकाल 94.73 टक्के आहे.

Maharashtra SSC 10th Result 2024: विभागनिहाय निकाल

पुणे - 96.44

नागपुर - 94.73

संभाजीनगर - 95.19

मुंबई - 95.83

कोल्हापूर - 97.45

अमरावती - 95.58

नाशिक - 95.28

लातूर - 95.27

कोकण - 99.01

दहावीचा निकाल कुठे पाहाल?

https://mahresult.nic.in

http://sscresult.mkcl.org

https://sscresult.mahahsscboard.in

https://results.digilocker.gov.in

https://results.targetpublications.org/

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com