महाराष्ट्र
शरद पवारांच्या काटेवाडीत 14 दिवसांचा लॉकडाऊन
शरद पवार कुटुंबीयांचं गाव असलेल्या काटेवाडीत 14 दिवसांकरिता कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. गावामध्ये कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.
गावामध्ये कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने पुढील 14 दिवस गाव बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळं काटेवाडी गावामध्ये शंभर टक्के लॉकडाऊन पाळला जात आहे. दोन दिवसापूर्वी गावांमध्ये अँटीजन कॅम्प घेतला होता, या कॅम्पमध्ये 27 रुग्ण आढळून आले. त्यामुळं गावात कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत.