14 वर्षीय मुलीचा मृत्यू; कोबी ठरली मृत्यूच कारण
एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. श्री गंगानगर जिल्ह्यात नुकत्याच घडलेल्या एका घटनेत कीटकनाशकांची फवारणी केलेल्या स्वतःच्या शेतातील कोबीची पाने खाल्ल्याने एका 14 वर्षीय मुलीचा मृत्यू झाला. तिने नकळत एक पान तोडून खाल्ले जे तिच्यासाठी जीवघेणे ठरले.
18 डिसेंबर रोजी, मुलीने आपल्या कुटुंबाच्या शेतातून कोबीचे पान तोडून खाल्ले. काही वेळाने तिला मळमळू लागले आणि तिने घरी येऊन आपल्या प्रकृतीबाबत कुटुंबियांना सांगितले. तिला तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान 24 डिसेंबर रोजी सायंकाळी तिचा मृत्यू झाला.
तपासाच्या वेळी असे आढळून आले की, मुलीच्या काकांनी शेतात पिकलेल्या कोबीवर कीटकनाशक फवारणी केली होती. हे कीटकनाशक तिच्या मरणाचे कारण ठरले.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलीचे वडील अश्विनी कुमार यांनी 25 डिसेंबर रोजी गुन्हा नोंदवला आणि त्यानंतर हे प्रकरण उघडकीस आले.