Cough Syrup
Cough Syrup

Cough Syrup : विषारी कफ सिरपमुळे नागपूरात आणखी एका बाळाचा मृत्यू

नागपुरातील शासकीय रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

थोडक्यात

  • विषारी कफ सिरपमुळे आणखी एका बाळाचा मृत्यू

  • नागपुरातील शासकीय रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू

  • किडनी निकामी होऊन मेंदूवर सूज आल्याने मृत्यू

(Cough Syrup) मध्य प्रदेश आणि राजस्थानमधील बालकांचा मृत्यू तमिळनाडूत उत्पादन होणाऱ्या एका कंपनीच्या खोकल्याच्या औषधामुळे झाल्याचा संशय व्यक्त केला जातो आहे. यामुळे 14 लहान मुलांचा मृत्यू झाला, तर काही मुलं आजारी पडली आहेत.

तामिळनाडूतील एका कंपनीच्या खोकल्याच्या औषधाच्या नमुन्यांत भेसळ आढळून आली असून आता या औषधावर बंदी घालण्यात आली आहे या घटनेनंतर देशभरातील आरोग्य यंत्रणा सतर्क झाल्या. मध्य प्रदेश, राजस्थान, तामिळनाडू आणि केरळ या राज्यांनी तात्काळ ‘कोल्ड्रिफ’ सिरपच्या विक्रीवर आणि वितरणावर बंदी घातली.

केंद्र सरकारने सर्व राज्यांना खबरदारी घेण्याचे निर्देश दिले असून, दूषित औषधांच्या नमुन्यांची तपासणी सुरू आहे. महाराष्ट्र सरकारनेही मोठा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्राच्या अन्न आणि नागरी पुरवठा विभागाने ‘कोल्ड्रिफ’ सिरपचा वापर त्वरित थांबवण्याचे निर्देश दिले आहेत.

यातच आता या विषारी कफ सिरपमुळे आणखी एका बाळाचा मृत्यू झाल्याची माहिती मिळच आहे. धानी डेहरिया असे या चिमुकलीचे नाव आहे. नागपूरातील शासकीय रुग्णालयात उपचारा दरम्यान या बाळाचा मृत्यू झाला असून मध्य प्रदेशातील छिंदवाडा जिल्ह्यातून नागपुरात उपचारासाठी गंभीर स्थितीत त्या बाळाला दाखल करण्यात आले होते. किडनी निकामी होऊन मेंदूवर सूज आल्याने त्या बाळावर उपचार सुरू होते अशी माहिती मिळत आहे. या कफ सिरपमुळे नागपूरात उपचार दरम्यान मृत्यू झालेल्यांची संख्या दहावर पोहचली आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com