Ulhasnagar
Ulhasnagar

Ulhasnagar : वंचितच्या 2 नगरसेवकांचा शिवसेनेला पाठिंबा; शिंदेंना पाठिंब्याचे पत्र केले सूपूर्द

उल्हासनगर महानगरपालिका निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीकडून निवडून आलेल्या दोन नगरसेवकांनी शिवसेनेला पाठिंबा दिल्याचे पाहायला मिळत आहे.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...

(Ulhasnagar) उल्हासनगर महानगरपालिका निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीकडून निवडून आलेल्या दोन नगरसेवकांनी शिवसेनेला पाठिंबा दिल्याचे पाहायला मिळत आहे.

उल्हासनगर महानगरपालिका निवडणुकीत वंचितकडून निवडून आलेले सुरेखा सोनावणे आणि विकास खरात या दोन नगरसेवकांनी शिवसेनेला पाठिंबा दिला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना त्यांच्या मुंबईतील निवासस्थानी भेट घेऊन आपल्या पाठिंब्याचे पत्र त्यांना सुपूर्द केले.

यावेळी आमदार डॉ. बालाजी किणीकर, माजी नगराध्यक्ष सुनील चौधरी आणि नगरसेवक योगेश जानकर, प्रवक्ते राहुल लोंढे हेदेखील यावेळी उपस्थित होते. प्रभागाच्या विकासासाठी, प्रभागातील कामे करण्यात यावीत यासाठी हा पाठिंबा देत असल्याचे त्यांनी सांगितले.

Summary

  • वंचितच्या 2 नगरसेवकांचा शिवसेनेला पाठिंबा

  • उल्हासनगर मनपात शिवसेनेला पाठिंबा

  • सुरेखा सोनावणे, विकास खरातचा पाठिंबा

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com