AB Form : उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी उरले 2 दिवस; सर्वच राजकीय पक्षांकडून काल रात्रीपासून फॉर्मचं वाटप
थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(AB Form ) येत्या 15 जानेवारी 2026 रोजी महापालिका निवडणुकीसाठी मतदान होणार आहे, तर 16 जानेवारी 2026 रोजी मतमोजणी होणार असून 2869 जागांसाठी ही निवडणूक होणार आहे. 23 डिसेंबर ते 30 डिसेंबर या कालावधीमध्ये महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारांना आपले उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत.
यातच राजकीय हालचालींना वेग आल्याचे पाहायला मिळत आहे. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्ष जोरदार तयारीला लागलं आहेत. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी फक्त 2 दिवस उरले असून एबी फॉर्म घेण्यासाठी उमेदवारांची पळापळ सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे.
सर्वच राजकीय पक्षांकडून काल रात्रीपासून फॉर्मचं वाटप सुरू करण्यात आले असून उमेदवारी जाहीर न झाल्याने अनेकांची धाकधूक वाढली आहे. आज सर्व पक्षांकडून उमेदवार यादी जाहीर करण्यात येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी मंगळवार 30 डिसेंबरपर्यंत मुदत आहे.
Summery
उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी उरले 2 दिवस
एबी फॉर्म घेण्यासाठी उमेदवारांची पळापळ
सर्वच राजकीय पक्षांकडून काल रात्रीपासून फॉर्मचं वाटप
