Maharashtra Unlock | राज्यातील 25 जिल्ह्यात निर्बंधांमध्ये शिथिलता, 11 जिल्हे लेव्हल तीन मध्ये; राजेश टोपे यांची घोषणा

Maharashtra Unlock | राज्यातील 25 जिल्ह्यात निर्बंधांमध्ये शिथिलता, 11 जिल्हे लेव्हल तीन मध्ये; राजेश टोपे यांची घोषणा

Published by :
Published on

राज्यातील 25 जिल्ह्यातील निर्बंधामध्ये शिथिलता देण्यात आली आहे. तसेच 11 जिल्ह्यांमध्ये लेव्हल तीनचे नियम कायम राहणार असून या ठिकाणी निर्बंध कायम राहणार आहेत, अशी घोषणा राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केली.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली टास्क फोर्स आणि आरोग्य विभागाची बैठक पार पडली. या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना राजेश टोपे यांनी राज्यातल्या २५ जिल्ह्यांमधले निर्बंध शिथिल करण्यात येणार आहेत. तर उर्वरीत ११ जिल्ह्यांमध्ये कोणतेही निर्बंध शिथिल करण्यात येणार नाहीत. या जिल्ह्यांमध्ये रुग्णसंख्या वाढली किंवा परिस्थिती बिघडली, तर स्थानिक प्रशासनाच्या माध्यमातून तेथील निर्बंध वाढण्यात येतील, असं देखील टोपे म्हणाले आहेत. यासंदर्भात अंतिम प्रस्ताव मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे पाठवण्यात आला असल्याचं देखील ते म्हणाले.

निर्बंध शिथिल करण्यात आलेल्या जिल्ह्यात शनिवार-रविवार लॉकडाऊन, शनिवार-रविवार पूर्णपणे बंदऐवजी शनिवारी संध्याकाळी ४ वाजेपर्यंत दुकानं सुरू आणि फक्त रविवारी बंद, खासगी कार्यालयांतील सर्व कर्मचाऱ्यांचं लसीकरण पूर्ण झालं असल्यास अशा ठिकाणी ५० टक्के कर्मचारी क्षमतेनुसार कार्यालये सुरू करण्याची मुभा अशा गोष्टींचा समावेश असेल. शॉप, रेस्टॉरंट, सिनेमाहॉल या गोष्टींना या अटी लावून त्या सुरू करण्यात येऊ शकेल.

११ जिल्ह्यांत निर्बंध कायम

निर्बंध शिथिल करण्यात आलेल्या २५ जिल्ह्यांव्यतिरिक्त उरलेल्या ११ जिल्ह्यांमध्ये सध्या अस्तित्वात असलेले निर्बंध कायम राहणार आहेत. यामध्ये पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सोलापूर, सांगली, सातारा, कोल्हापूर हे जिल्हे, कोकणातील रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, पालघर हे जिल्हे, मराठवाड्यातील बीड तर उत्तर महाराष्ट्रातील अहमदनगरमधील निर्बंध कायम राहणार आहेत.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com