रवी राणासह २५ शेतकऱ्यांची निर्दोष मुक्तता…

रवी राणासह २५ शेतकऱ्यांची निर्दोष मुक्तता…

Published by :
Published on

बडनेरा विधानसभेचे आमदार रवी राणा यांनी बुधवारी सकाळी ११.३० वाजता आंदोलनप्रकरणी सुनावणीसाठी स्थानिक दिवाणी आणि फौजदारी न्यायालयात हजेरी लावली. शेतकऱ्यांसाठी आंदोलन केले तर तुरूंगात टाकले जाते, अशी टिका रवी राणा यांनी राज्य सरकार आणि उध्दव ठाकरे यांच्यावर केली.

मागील वर्षी राणा यांच्या नेतृत्वात मोझरी येथे अमरावती- नागपुर राष्ट्रीय महामार्गावर शेतकऱ्यांच्या विविध मागण्यासंदर्भात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले होते. त्यावेळी तिवसा पोलिसांनी आमदार रवी राणा, पक्षाचे कार्यकर्त आणि शेतकऱ्यांवर गुन्हा दाखल करुन तीन दिवस कारागृहात रवानगी केली होती. हे आंदोलन शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रूपये मदत मिळावी आणि लॅाकडाउन काळात वीज बील निम्मे माफ करण्यात यावे यासाठी केले होते.

या प्रकरणाची सुनावणी आज तिवसा न्यायालयात सुरू असताना न्यायालयाचे न्यायाधीश श्री. कोरडे यांनी कलम ३४१, २६९, १८८, १४३, १३५ या कलमातुन आमदार रवी राणा सह कार्यकर्त आणि शेतकरी यांची निर्दोष मुक्तता केली. या प्रकरणात ऍड. आशिष लांडे यांनी न्यायालयात रवी राणा यांची बाजु मांडली. निकालासंर्दभात आमदार राणा आणि शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले. तसेच शेतकऱ्यांना मदत नाही मिळाली तर मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंची दिवाळी साजरी करुन देणार नाही, असा इशारा यांनी दिला आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com