अज्ञातांनी कापले तब्बल पपईचे २५०० झाड; शेतकऱ्यांचे ७ लाखाचे नुकसान

अज्ञातांनी कापले तब्बल पपईचे २५०० झाड; शेतकऱ्यांचे ७ लाखाचे नुकसान

Published by :
Published on

अमरावती जिल्ह्यातील अचलपूर तालुक्यातील बिलनपुरा येथे अज्ञात चोरट्यानी चक्क २५०० पपईचे झाडे तोडल्याचा प्रकार घडला आहे. चोरट्यानी मनोहर यांच्या शेतात प्रवेश करून पपईचे झाडे कापली आहेत. ते शेतात पोहचताच त्यांना कापलेली पपईची झाडे दिसली.

पपईची झाडे जमीनदोस्त झाल्याने मनोहर पोकळे यांच ७ लक्ष रुपयाचं नुकसान झाले आहे. मनोहरने याबाबत अज्ञात व्यक्तिविरोधात अचलपूर पोलिसात तक्रार दिली. पोलिसांनी अज्ञात व्यक्तिविरोधात गुन्हा नोंदविला आहे. बदलाच्या भावनेतून हा प्रकार घडला असावा असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com