मुंबईच्या गोवंडी भागात इमारत कोसळून 3 ठार, 7 जखमी

मुंबईच्या गोवंडी भागात इमारत कोसळून 3 ठार, 7 जखमी

Published by :
Published on

मुंबईच्या गोवंडी भागात इमारत कोसळून 3 ठार झाले असून 7 जण जखमी झाल्याची माहिती मिळत आहे.

गोवंडीच्या शिवाजीनगर परिसरात शुक्रवारी पहाटे ४.५८ वाजता तळमजला अधिक एक मजला असलेल्या इमारतीचा भाग कोसळल्याने तीन जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये आणखी ७ जण जखमी झाले असून त्यांना राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

भारतीय हवामान खात्याने बुधवारी मुंबईसाठी 'रेड अलर्ट' जारी केला होता, तर आज ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. याशिवाय, रायगड, महाराष्ट्रात चार ठिकाणी दरडी कोसळल्या असून त्यात पाच लोकांचा मृत्यू झाला आहे, तर काही लोक बेपत्ता असल्याचे सांगितले जात आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com