3 मार्चपर्यंत ईडी कोठडी, मलिकांनी ट्विट करत दिला भाजपला सूचक इशारा!
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांना 3 मार्चपर्यंत ईडी कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यामुळे मलिक यांच्या अडचणी वाढणार आहे. दरम्यान ईडी कोठडी सुनावल्यानंतर मलिकांनी 'हमारा दौर आएगा !' असे ट्विट करत भाजपला सुचक इशारा दिला आहे.
नवाब मलिक यांना आज अंमलबजावणी संचालनालय (Enforcement Directorate) अर्थात ईडीकडून अटक करण्यात आली होती. त्यानंतर त्यांची मेडिकल चाचणी झाल्यानंतर त्यांना कोर्टात हजर करण्यात आलं. जवळपास अडीच तासापेक्षा अधिक वेळ दोन्ही बाजूने युक्तीवाद पार पडल्यानंतर कोर्टाने नवाब मलिक यांना 8 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
दरम्यान, नवाब मलिक यांना 8 दिवसांची ईडी कोठडी सुनावण्यात आल्यानंतर नवाब मलिक यांनी एक ट्वीट करत भाजपला सूचक इशारा दिलाय. 'कुछ ही देर की ख़ामोशी है फिर शोर आएगा… तुम्हारा तो सिर्फ वक़्त है हमारा दौर आएगा !', असं ट्वीट मलिकांनी केलंय.