Maharashtra Corona | राज्यात ४ हजार १५४ नवीन कोरोनाबाधित

Maharashtra Corona | राज्यात ४ हजार १५४ नवीन कोरोनाबाधित

Published by :

राज्यात कोरोना संसर्गाची दुसरी लाट अद्याप ओसरली नाही आहे. आज दिवसभरात ४ हजार ५२४ रूग्ण कोरोनामधून बरे झाले, तर ४ हजार १५४ नवीन कोरोना बाधितांची नोंद झाली. याशिवाय, ४४ कोरोनाबाधित रूग्णांचा मृत्यू देखील झाला.

राज्यात आज दिवसभरात ४ हजार ५२४ रूग्ण कोरोनामधून बरे झाले, आजपर्यंत एकूण ६२,९९,७६० कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) ९७.०५ टक्के एवढे झाले आहे.

४ हजार १५४ नवीन कोरोनाबाधितांची नोंद झाली. आता राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या ६४,९१,१७९ झाली आहे. याशिवाय, ४४ कोरोनाबाधित रूग्णांचा मृत्यू देखील झाला. राज्यात आजपर्यंत १३८०६१ कोरोनाबाधितांचा मृत्यू झालेला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.१२ टक्के एवढा आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com