बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकासाठी तब्बल 400 कोटी मंजूर

बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकासाठी तब्बल 400 कोटी मंजूर

Published by :
Published on

शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवाजी पार्कजवळील महापौर बंगल्यात उभारण्यात येत असलेल्या स्मारकाचा खर्च आता ४०० कोटी रुपयांवर पोहोचला आहे. या रकमेच्या सुधारित खर्चास राज्य मंत्रिमंडळाच्या रविवारी झालेल्या बैठकीत मान्यता देण्यात आली. स्मारकाच्या पहिल्या टप्प्यासाठी २५० कोटी रुपये, तर दुसऱ्या टप्प्यासाठी १५० कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत.

स्मारकाच्या रखडलेल्या कामामुळे अंदाजित खर्चातदेखील वाढ करावी लागली आहे. पहिल्या टप्प्यात स्थापत्य, विद्युत, वातानुकुलित यंत्रणा उभारणी, इमारतीच्या अंतर्गत आणि बाह्य सजावट, वाहनतळ उभारणी, बागबगिचा तयार करणे, रेनवॉटर हार्वेस्टिंग इत्यादी कामं केली जातील. या सर्व कामांसाठी पहिल्या टप्प्यात अंदाजे 250 कोटी रुपये देण्यात येणार आहेत.

दुसऱ्या टप्प्यात बाळासाहेबांच्या स्मारकाच्या अद्ययवतीकरणावपर काम केले जाईल. राज्य सरकारकडून बाळासाहेबांच्या स्मारकासाठी दुसऱ्या टप्प्यात 150 कोटी रुपये देण्यात येणार आहेत. दुसऱ्या टप्प्यात तंत्रज्ञानविषयक कामं केली जाणार आहेत. यामध्ये लेझर शो, डिजिटल मॅपिंग प्रोजेक्शन, कथा/गोष्टी सांगणे, चित्रपट, व्हर्च्यूअल रियालिटी शो आणि तांत्रिक बाबींवर काम केले जाईल. इमारतीचे बांधकाम पूर्णत्वास येत असताना ही कामं केली जातील.

दरम्यान, पहिला आणि दुसऱा टप्पा मिळून एकूण 400 कोटींचा खर्च होणे राज्य सरकारला अपेक्षित आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या राष्ट्रीय स्मारक प्रकल्पासाठी लागणारा 400 कोटींचा खर्चा सुरुवातीला मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण करणार आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com