पुणे सोलापूर महामार्गावर 5 जणांना चिरडले, तिघांचा मृत्यू दोघे जखमी

पुणे सोलापूर महामार्गावर 5 जणांना चिरडले, तिघांचा मृत्यू दोघे जखमी

Published by :
Published on

विनोद गायकवाड | पुणे सोलापूर महामार्गावर अज्ञात वाहनाने 5 जणांना चिरडल्याची घटना घडली आहे. या घटनेत तीन जणांचा जागीच मृत्यू तर दोन जण गंभीररित्या जखमी झाले आहेत. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

पुणे-सोलापूर महामार्गावरील कुरकुंभ गावच्या हद्दीमध्ये पुण्यावरून सोलापूरच्या दिशेने जाणाऱ्या अज्ञात वाहनाने पाच जणांना चिरडल्याची घटना घडलीय.अज्ञात वाहनाच्या धडकेत तीन जणांचा जागीच मृत्यू झालाय तर दोन जण गंभीर रित्या जखमी झालेत.अज्ञात वाहन पुणे-सोलापूर महामार्गावरील पुण्याकडून सोलापूर दिशेने चालले होते याच दरम्यान महामार्ग क्रॉस करताना अज्ञात वाहनाची धडक बसल्याने तीन जणांचा जागीच मृत्यू झाला या अपघातात एका महिलेसह दोन लहान मुलांचा देखील समावेश आहे.तर दोघा जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com