Maharashtra School
Maharashtra School

Maharashtra School : राज्यातील 5 हजार शाळा 2 दिवस राहणार बंद, कारण काय?

राज्यातील 5 हजार शाळा 2 दिवस बंद राहणार असल्याची माहिती मिळत आहे.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

(Maharashtra School ) राज्यातील 5 हजार शाळा 2 दिवस बंद राहणार असल्याची माहिती मिळत आहे. अंशत: अनुदानित शाळा 2 दिवस बंद राहणार आहेत. राज्यामध्ये जवळपास 5 हजार 844 खासगी अंशत: अनुदानित शाळा आहेत.

पाच हजार विनाअनुदानित शाळांना टप्प्याटप्याने अनुदान देण्यासंदर्भातील निर्णय राज्य सरकारने ऑक्टोबर 2024 मध्ये अधिवेशनात घेतला होता. त्यानंतर यासंदर्भात शासन निर्णयही काढण्यात आला होता. मात्र अजून देखील या शाळांच्या टप्पा अनुदानासाठी निधीची तरतूद सरकारकडून करण्यात आलेली नाही.

याच पार्श्वभूमीवर आझाद मैदानामध्ये धरणे आंदोलन सुरू करण्यात आले असून 8 व 9 जुलै रोजी राज्यातील या पाच हजार शाळा बंद ठेवण्याचा निर्णय शिक्षकांनी घेतला आहे. प्रलंबित मागण्यांसाठी शिक्षक पुन्हा एकदा रस्त्यावर उतरले आहेत.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com