राज ठाकरेंच्या दौऱ्यानंतर औरंगाबादेत 53 कार्यकर्त्यांचा राजीनामा
सचिन बडे | मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा औरंगाबाद दौरा आटोपताच मनसेला गळती सूरू झाली आहे. औरंगाबादेत एकाच वेळी दिले 53 जणांनी राजीनामे दिले आहेत. ऐन निवडणुकीच्या तोंडावर मनसेसाठी हा मोठा धक्का मानला जातो. याचा परिणाम निश्चितच महापालिका निवडणुकीत दिसून येईल, अशा चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नुकताच १४ डिसेंबर रोजी औरंगाबाद दौरा केला. या दरम्यान त्यांनी मराठवाड्यातील सर्व मनसे पदाधिकाऱ्यांची मोठी बैठक घेतली होती. पक्ष कार्यकारिणीत मोठे बदल केले होते. यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला औरंगाबाद येथे मोठे खिंडार पडले आहे. मनसेच्या ५३ कार्यकर्त्यांनी एकाच वेळी राजीनामा दिल्याने पक्षाला मोठी गळती सुरू झाली आहे. मनसेच्या वरिष्ठ नेत्यांनी चार कार्यकर्त्यांची हकालपट्टी केल्यानंतर अचानक इतरही कार्यकर्त्यांनी राजीनामा दिल्याने ऐन निवडणुकीच्या तोंडावर मनसेसाठी हा मोठा धक्का मानला जातो. गेल्या काही दिवसांपासून स्थानिक गटबाजीमुळे औरंगाबादमधील मनसेत फूट पडल्याची चर्चा होती.