पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिकाला 66 लाखांचा गंडा; दोघांना बिहारमधून अटक

पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिकाला 66 लाखांचा गंडा; दोघांना बिहारमधून अटक

पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यवसायिकाला 66 लाख रुपयांचा गंडा घातल्याची बातमी समोर येत आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोन जणांना बिहारमधून अटक केली आहे.
Published on

पुणे : पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यवसायिकाला 66 लाख रुपयांचा गंडा घातल्याची बातमी समोर येत आहे. फेक कॉलच्या माध्यमातून हा गंडा घातला आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोन जणांना बिहारमधून अटक केली आहे. बेलाल शाबीर अन्सारी, कामरान इम्तियाज अन्सारी असं अटक करण्यात आलेल्या दोन्ही आरोपींची नावे आहेत.

पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिकाला 66 लाखांचा गंडा; दोघांना बिहारमधून अटक
पाच किडनी विकणे आहे! पोस्टर झळकल्याने एकच खळबळ

माहितीनुसार, पुणे शहरात मे महिन्यात बिल्डरच्या ऑफिसमध्ये बेलाल शाबीर अन्सारी आणि कामरान इम्तियाज अन्सारी यांनी फोन केला. यावेळी संबंधित कंपनीचा संचालक बोलत असल्याचं भासवत 66 लाखांचा गंडा घातला. याप्रकरणी पोलिसांनी दोघांना बिहारमधून अटक केली आहे.

या आरोपींकडून 36 सीम कार्ड, 8 मोबाईल फोन, 19 एटीएम कार्ड आणि 1 गावठी पिस्तूलासह 6 जिंवत काडतुसे जप्त करण्यात आली आहे. दोन्ही आरोपी रेकॉर्डवरील गुन्हेगार असून बिहार राज्यात यांच्यावर याआधी अनेक गुन्हे दाखल असल्याची पुणे पोलिसांनी माहिती दिली. पुणे शहरात देखील अनेक बिल्डरांना या दोन्ही आरोपीने याआधी फेक कॉल करत गंडा घातल्याचेही समोर आले आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com