Municipal Corporation Election : महानगरपालिका निवडणूक होण्यापूर्वीच 70 नगरसेवक बिनविरोध
थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(Municipal Corporation Election 2026 ) महापालिका निवडणुकांसाठी सर्वच पक्ष तयारीला लागले आहेत. येत्या 15 जानेवारी 2026 रोजी महापालिका निवडणुकीसाठी मतदान होणार आहे, तर 16 जानेवारी 2026 रोजी मतमोजणी होणार असून 2869 जागांसाठी ही निवडणूक होणार आहे.
राज्यात 29 महापालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. महापालिकांची निवडणूक अर्ज मागे घेण्याची मुदत आता संपली असून आज निवडणूक चिन्हं आणि अंतिम उमेदवार यादी जाहीर केली जाणार आहे.
आजपासून उमेदवारांच्या प्रचार फेरी, सभांना सुरुवात होईल. अनेक ठिकाणी स्थानिक नेते आणि प्रमुख नेत्यांच्या सभा होतील. यातच आता महानगरपालिका निवडणुकीत निवडणूक होण्यापूर्वीच 70 नगरसेवक बिनविरोध निवडून आले आहेत.
यामध्ये भाजपचे सर्वाधिक 44 नगरसेवक बिनविरोध निवडून आले.तर शिवसेनेचे 22 नगरसेवक निवडून आले आहेत. राष्ट्रवादीचे 2, इस्लामिक पार्टीचा 1 आणि 1 अपक्ष उमेदवार बिनविरोधात निवडून आले आहेत.
Summary
महानगरपालिका निवडणूक होण्यापूर्वीच 70 नगरसेवक बिनविरोध
भाजपचे सर्वाधिक 44 नगरसेवक बिनविरोध
शिंदेंच्या शिवसेनेचे 22 तर राष्ट्रवादीचे 2 आणि इस्लामिक पार्टीचा 1 आणि 1 अपक्ष उमेदवार बिनविरोध
