घाटकोपरच्या पंतनगरमध्ये 70 लाखांची रोकड जप्त; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई

घाटकोपरच्या पंतनगरमध्ये 70 लाखांची रोकड जप्त; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई

घाटकोपरमधून मोठी बातमी समोर आली आहे. घाटकोपरच्या पंतनगरमध्ये 70 लाखांची रोकड जप्त करण्यात आली आहे.
Published by :
Dhanshree Shintre
Published on

घाटकोपरमधून मोठी बातमी समोर आली आहे. घाटकोपरच्या पंतनगरमध्ये 70 लाखांची रोकड जप्त करण्यात आली आहे. घाटकोपरमध्ये निवडणूक आयोगाने मोठी कारवाई केली आहे. याप्रकरणी दोन जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

इलेक्शन सेलच्या स्टॅटिक सर्विलेन्स स्कॉडने गाडीतून ७२ लाख ३९ हजार ६७५ रुपये जप्त केले आहेत. ताब्यात घेण्यात आलेल्या व्यक्तींपैकी एक CA तर दुसरा इनक्मटॅक्स प्रॅक्टिसनर असल्याचे समोर आले आहे.

जप्त करण्यात आलेली रक्कम एका विकासकाकडून पाठवण्यात आल्याची प्राथमिक माहिती समोर आली असून या प्रकरणी पंतनगर पोलिस आणि इलेक्शन सेलच्या स्टॅटिक सर्विलेन्स स्कॉड अधिक तपास करत आहेत. इनकम टॅक्स अधिकाऱ्यांनी सबंधित रक्कम जप्त केली असून त्यांच्याकडून पुढील चौकशी केली जाणार आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com